JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘किती स्वार्थी आहेस तू?’; पैसे मागणारी सर्वात श्रीमंत अभिनेत्री होतेय ट्रोल

‘किती स्वार्थी आहेस तू?’; पैसे मागणारी सर्वात श्रीमंत अभिनेत्री होतेय ट्रोल

दिवसाला करते 20 लाख रुपयांचा मेकअप… पण मित्राचे प्राण वाचवायला नाहीत पैसे; चाहत्यांकडे पैसे मागणारी जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री होतेय ट्रोल

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 19 एप्रिल**:** कायली जेनर (Kylie Jenner) ही जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. वर्षाला ती जवळपास एक हजार कोटी रुपयांची कमाई करते. यावरुनच तिच्या श्रीमंतीचा तुम्हाला अंदाज येईल. एवढंच काय तर गेल्या तीन वर्षात ती सातत्यानं जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या कलाकारांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. अर्थात भरमसाठ कमाई असल्यामुळं तिची जीवनशैली देखील तितकीच राजेशाही पद्धतीची आहे. नुसत्या मेकअपवरच ही अभिनेत्री दिवसाला जवळपास 20 लाख रुपये खर्च करते. मात्र इतका पैसा असूनही तिनं आपल्या मेकअप आर्टिस्टच्या शस्त्रक्रियेसाठी चाहत्यांकडे पैसे मागितले आहेत. (Kylie Jenner brutally trolled) अन् त्यामुळं आता तिला जोरदार ट्रोल केलं जात आहे.

कायलीचा मेकअप आर्टिस्ट गेल्या काही महिन्यांपासून कर्करोगामुळं त्रस्त आहे. त्याच्या शस्त्रक्रियेसाठी लोकांनी आर्थिक मदत करावी अशी विनंती कायलीनं एका सोशल मीडिया पोस्टद्वारे केली होती. मी पाच हजार डॉलर्सची मदत केली आहे. तुम्ही देखील मदतीचा हात पुढे करावा अशी विनंती तिनं या पोस्टद्वारे केली होती.

संबंधित बातम्या

जाहिरात
जाहिरात
जाहिरात

ही पोस्ट पाहून चाहते मदतीचा ओघ सुरु करतील अशी अपेक्षा कायलीला होती. मात्र झालं उलटचं. या पोस्टमुळं तिच्याविरोधात जणू टीकाचे लाट आली. जर तुझ्याकडे इतका पैसा आहे तर तुच मदत का करत नाहीस? नुसत्या मेकअपवरच लाखो डॉलर्स खर्च करतेस पण जो व्यक्ती मेकअप करतो त्याचं आयुष्य वाचवायला मात्र तुझ्याकडे पैसे नाहीत ही अत्यंत दुदैवाची बाब आहे. अशा आशयाच्या प्रतिक्रिया देऊन नेटकरी तिच्याविरोधात आपला संताप व्यक्त करत आहेत. अनेकांनी तर या प्रकणामुळं तिला अनफॉलो करण्यासही सुरुवात केली आहे.

जाहिरात

कायलीनं 2016 मध्ये कायली कॉस्मेटिक्स नावाची एक ब्यूटी प्रोडक्ट तयार करणारी कंपनी सुरु केली. या कंपनी दर वर्षाला जवळपास सहा हजार 400 कोटी रुपयांची उलाढाल करते. मात्र इतके पैसे असतानाही ती आपल्या मित्राचं आयुष्य वाचवण्यासाठी काही लाखांची मदत करु शकत नाही त्यामुळं नेटकरी संतापले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या