JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Bigg Boss Marathi तिसरं पर्व IPL च्याच मुहूर्तावर; होस्ट मांजरेकरांचा खास लुक पाहिलात का?

Bigg Boss Marathi तिसरं पर्व IPL च्याच मुहूर्तावर; होस्ट मांजरेकरांचा खास लुक पाहिलात का?

Bigg Boss Marathi चा Season 3 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. महेश मांजरेकर होस्ट असतील. कर्करोगासारख्या आजारपणातून उठून त्यांनी कामाला सुरुवातही केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 ऑगस्ट: मराठी रिअॅलिटी शो bigg boss Marathi चं तिसरं पर्व सप्टेंबरपासून सुरू होत आहे. या शोची लाँच डेट जाहीर करण्यात आली आहे. बिग बॉस मराठीचे होस्ट महेश मांजरेकर यांचा खास लुकसुद्धा समोर आला आहे. सप्टेंबर महिन्यात मनोरंजनाचा डबल डोस असणार हे यामुळे निश्चित झालं आहे. कारण ज्या दिवशी IPL चं बिगुल वाजणार त्याच दिवशी बिग बॉसचा तिसरा सीझन सुरू होत आहे. 19 सप्टेंबरपासून कलर्स मराठी वाहिनीवर ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात होणार आहे. त्याच दिवशीपासून IPL 2021 सुरू होणार आहे हे विशेष. ‘बिग बॉस मराठी 3’ साठी स्पर्धक कोण असतील हे अद्याप निश्चित झालेलं नाही. होस्ट मात्र महेश मांजरेकर हेच असणार आहेत. नुकतेच मांजरेकर यांच्यावर कर्करोगाचे उपचार झाले. त्यातून बरे झाल्यानंतर लगेच त्यांनी शूटिंगची लगबग सुरू केली आहे.’ हीच का ती सैराटची आर्ची? रिंकूचे Latest फोटो पाहून विश्वास नाही बसणार महेश मांजरेकर यांनी या सीझनच्या शूटसाठी खास लुक धारण केला आहे. त्यांचे हे फोटो कलर्स मराठी वाहिनीने शेअर केले आहेत.

संबंधित बातम्या

बिग बॉस मराठीच्या दोन्ही सीझनना चांगलं यश मिळालं होतं. वाद, चर्चा आणि बोलबालाही चिकार झाला होता. त्यामुळे तिसऱ्या सीझनबद्दल उत्सुकता आहे. कलर्स मराठीवर #BiggBossMarathi3  19 सप्टेंबरला संध्याकाळी 7 वाजता बिग बॉसचं घर नवीन पर्वासाठी उघडेल. दररोज रात्री 9.30 वाजता हा रिअॅलिटी शो प्रदर्शित होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या