JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Akshay Kelkar : रिक्षावाल्याचा मुलगा ते बिग बॉसचा विजेता; अक्षयनं सार्थकी ठरवले गर्लफ्रेंडचे 'ते' शब्द

Akshay Kelkar : रिक्षावाल्याचा मुलगा ते बिग बॉसचा विजेता; अक्षयनं सार्थकी ठरवले गर्लफ्रेंडचे 'ते' शब्द

खेळाडू वृत्ती, स्पष्टवक्तेपणा आणि कठोर निर्णयक्षमता या गुणांच्या बळावर अक्षयने या पर्वाच विजेतेपद स्वतःच्या नावावर केलं. पण त्याचा आजवरचा प्रवास एवढा सोपा नव्हता. आज जाणून घेऊया त्याचा आजवरचा प्रवास.

जाहिरात

अक्षय केळकर

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 09 जानेवारी:  ‘ बिग बॉस मराठी' च्या  विजेत्याचं नाव अखेर समोर आलं आहे. मास्टर माइंड अक्षय केळकर या पर्वाचा विजेता ठरला आहे. 100 दिवसांच्या या खेळात दमदार खेळी खेळत अक्षयने विजेतेपदावर नाव कोरलं. तसेच तो या पर्वाचा ‘कॅप्टन ऑफ द सिझन’ देखील ठरला आहे. खेळाडू वृत्ती, स्पष्टवक्तेपणा आणि कठोर निर्णयक्षमता या गुणांच्या बळावर अक्षयने या पर्वाच विजेतेपद स्वतःच्या नावावर केलं.  पण त्याचा आजवरचा प्रवास एवढा सोपा नव्हता. घरची आर्थिक परिस्थिती देखील तितकी चांगली नव्हती. या सगळ्यातून जेतेपद पटकावलेल्या अक्षयचं सगळीकडेच कौतुक होत आहे. आज जाणून घेऊया त्याचा आजवरचा प्रवास. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाची 8 जानेवारी रोजी सांगता झाली. अक्षय केळकर या सीझनचा विजेता ठरला. 19 सदस्यांमधून अक्षयने जेतेपदावर बाजी मारली तर अभिनेत्री अपूर्वा नेमाळेकरने उपविजेतेपद पटकावले. अक्षयला बिग बॉसची ट्रॉफी आणि 15 लाख 55 हजार रुपये बक्षिसाची रक्कम म्हणून देण्यात आली. त्याबरोबर त्याला पु.ना.गाडगीळ आणि सन्स तर्फे 10 लाख रुपयांचे बंपर गिफ्ट व्हाऊचरही देण्यात आले. फिनोलेक्स पाईप त्यांच्याकडून त्याला 5 लाख रकमेचा चेक देखील मिळाला. हेही वाचा - Bigg Boss Marathi 4: ‘मनासारखं खेळता नाही आलं…’ अक्षय विजेता झाल्यानंतर रुचिराने व्यक्त केली खंत अक्षय केळकरचे वडील रिक्षा चालवतात. विशेष म्हणजे बिग बॉसच्या सेटवर तो वडिलांच्या रिक्षातूनच पोहोचला होता. यावेळीच त्याने घरच्या आर्थिक परिस्थिती विषयी देखील सांगितलं होतं. अक्षयसाठी त्याचं कुटुंब खूप महत्वाचं आहे. बिग बॉसच्या घरात घरच्यांविषयी बोलताना तो अनेकदा भावुक झालेला पाहायला मिळाला. तसेच अक्षयच्या गर्लफ्रेंडने त्याला पाठवलेल्या पात्रात ‘तू शून्यातून विश्व निर्माण केलं आहेस..’ असं म्हंटलं  होतं. आता बिग बॉसचं विजेतेपद जिंकत अक्षयने आपल्या गार्ल्फ्रेंडचे हे शब्द सार्थकी ठरवले आहे.

संबंधित बातम्या

अक्षयने 2013 साली ‘बे दुने दहा’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर ‘कमला’ मालिकेत त्याने साकारलेली उदय देशपांडेची भूमिका प्रचंड गाजली. अक्षयने ‘प्रेमसाथी’ या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. अवधूत गुप्तेच्या ‘कान्हा’ या सिनेमात त्याच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली आहे. ‘कॉलेज कॅफे’ या सिनेमात तो मुख्य भूमिकेत होता. तसेच त्याचा टकाटक २ हा चित्रपट देखील चांगलाच गाजला. सब टीव्हीच्या ‘भाखरवडी’ आणि ‘निमा डेंगझोपा’ या हिंदी मालिकांत देखील त्याने काम केलं आहे. यासोबतच अक्षयने काही शॉर्ट फिल्म्समध्ये देखील आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.

विजेतेपदावर नाव कोरल्यानंतर अक्षयने एक खास पोस्ट लिहिली आहे. चाहत्यांचे आभार मानत त्याने लिहिलं आहे,“हे फक्त आणि फक्त तुम्हा प्रेक्षकांमुळे होऊ शकलय! खूप खूप खूप धन्यवाद आणि मनापासून आभार! मी खऱ्या अर्थाने तुमचाच झालोय!”. अक्षयच्या पोस्टवर सेलिब्रिटींसह चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या