JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Bigg Boss Marathi 4च्या घरात कोण आहे "पप्पू द भांडी घाश्या"? अपूर्वानं साधला निशाणा

Bigg Boss Marathi 4च्या घरात कोण आहे "पप्पू द भांडी घाश्या"? अपूर्वानं साधला निशाणा

बिग बॉसच्या घरात 16 सदस्य आले. त्यातील एकाला पप्पू अशा नावानं चिडवलं जात आहे. पप्पू भांडी घाश्या असं नवं नावं त्याला देण्यात आलंय. कोण आहे का पप्पू भांडी घाश्या?

जाहिरात

बिग बॉस मराठी 4

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 07 ऑक्टोबर :  बिग बॉस मराठीचा चौथा सीझन सुरू झालाय. चौथ्या सीझनमध्ये पहिल्या आठवड्यांमध्येच स्पर्धकांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. प्रत्येक सीझनप्रमाणे घरात दोन गट पडले आहेत. काल घरात गरबा नाईट साजरी झाली. तर आजपासून पुन्हा एकदा टास्कला सुरूवात होणार आहे. बिग बॉस मराठी 4 च्या पहिल्या कॅप्टनसाठी कॅप्टन्सी कार्य पार पडणार आहे. बिग बॉसच्या घरात 16 सदस्य आले. पण यात एक पप्पू नावाचा सदस्य देखील दाखल झाला आहे. नुसताच पप्पू नाही तर “पप्पू द भांडी घाश्या” असा उल्लेख एका स्पर्धकाचा केला जात आहे. पण कोण आहे हा पप्पू द भांडी घाश्या जाणून घ्या. बिग बॉस मराठीच्या घरात आजचा पाचवा दिवस आहे.  आपण पाहिलं तर मागच्या चार दिवपांसून घरात अपूर्वा चा आवाज प्रचंड वाढला आहे.  अपूर्वा आणि प्रसाद यांच्यात चांगलीच भांडणं झाली आहेत. बिग बॉसच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे की अपूर्वा, अक्षय, रुचिरा, रोहीत यांच्यात गॉसिप सुरू आहे. आणि गॉसिपचा विषय हा भांडी घाश्या आहे.  चौघेही प्रसाद जवादेला उद्देशून गॉसिप करत आहेत. हेही वाचा - BBM4: ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सुरु होणार भन्नाट टास्क; कोण ठरणार सीजनचा ‘पहिला कॅप्टन’? घरामध्ये काही दिवसांतच ग्रुप पडून आता कट आखले जात आहे. तेव्हा अपूर्वा म्हणते “माझी तर मनापासून इच्छा आहे किचनचं कामं ना पप्पूकडे आलं पाहिजे”. त्यावर अक्षय म्हणाला, “चूक आहेस तू साफ सफाई देऊया. कसं आहे बघ मला असं वाटतं, जेवण आहे ना ते उत्तम व्यक्तीलाच देऊयात. सगळयांचं म्हणणं आहे भांडी घाश्या बनवू त्याला”. त्यावर अपूर्वा, रोहित यांच्या कंमेंट सुरु झाल्यात.

संबंधित बातम्या

शेवटी अपूर्वा म्हणते, “हा माणूस येतो, डिनर टेबलवर खातो आणि निघून जातो”. या वाक्यावरून अपूर्वा प्रसादला उद्देशून बोलत आहे हे लक्षात येत आहे. तरीही नेमका पप्पू भांडी घाश्या कोण आहे हे आजच्या बिग बॉसच्या एपिसोडमध्ये कळणार आहे.

आज शुक्रवारच्या एपिसोडमध्ये घराला पहिला कॅप्टन मिळणार आहे. कॅप्टन्सीसाठी पैशांचा पाऊस हा गेम होणार आहे. घरात पैशांचा पाऊस पडणार आहे. पैशांचा जो सदस्य सर्वाधिक लुटेल त्याला बिग बॉसच्या चौथ्या सीझनचा पहिला कॅप्टन होण्याचा मान मिळणार आहे आणि तो सदस्य एका आठवड्यासाठी सेफ होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या