बिग बॉसच्या घरात स्पर्धकांचा आज तिसरा दिवस असणार आहे. आज कॅप्टनसी मिळण्यासाठी स्पर्धकांमध्ये स्पर्धा रंगणार आहे.
कॅप्टनसी साठी बिग बॉस मराठी सिझन चौथाचे पहिले साप्ताहिक कार्य "दे धडक - बेधडक" हे स्पर्धकांना खेळावं लागणार आहे.
टास्कमध्ये सगळ्याचं सदस्यांचा गोंधळ उडाला. Team A विरुध्द्व Team B असा टास्क रंगणार असून अपूर्वा आणि प्रसाद साप्ताहिक कार्याचे संचालक असणार आहेत.
साप्ताहिक कार्याच्या पहिल्या उपकार्यामध्ये सदस्यांमध्ये सुरुवात होताच गोंधळ उडाला, बिग बॉस यांच्या आदेशानंतर देखील सदस्यांमधील ओढाताण थांबेना.
आता कार्यात कोणती टीम विजयी होणार आणि कोणत्या सदस्यांना कॅप्टनसीची उमेदवारी मिळणार हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.
टास्कबद्दल टीम A आणि टीम B मध्ये आज चांगलीच चर्चा रंगताना दिसणार आहे. अपूर्वाचे म्हणणे आहे, "मी सांगितल्याप्रमाणे फेअर संचालक असणार आहे, ते चांगले खेळले तर तसं म्हणेन" ज्यावर अक्षय असहमती दर्शवणार आहे.
अपूर्वा आणि प्रसादच पहिल्या दिवसापासून खटकलं आहे. अपूर्वा म्हणाली कोण खेळणार ते मी ठरवणार आणि पुढच्या फेरीसाठी अक्षय, मेघा आणि योगेश खेळणार. तर, दुसऱ्या टीमची देखील चर्चा सुरु आहे, त्यावर प्रसादाचे म्हणणे आहे, सगळे सगळं बघतं आहे
''दे धडक - बेधडक" या टास्क दरम्यान स्पर्धकांमध्ये चांगलाच राडा झाला. आता यातून कोणाला कॅप्टनसी मिळणार ते लवकरच कळेल.