'बिग बॉस मराठी'चा चौथा सीजन पहिल्या आठवड्यातच अधिकाधिक रंजक बनत आहे. स्पर्धकांना एकापाठोपाठ एक हटके टास्क मिळत आहेत. टास्कदरम्यान अनेक राडेसुद्धा पाहायला मिळत आहेत.
'बिग बॉस मराठी'च्या घरामध्ये काल चान्स पे डान्समधील धमाकेदार उपकार्य पार पडलं. यामध्ये टीम A विजयी ठरली. त्यानुसार टीम A ने चौथ्या सीजनच्या पहिल्या साप्ताहिक कार्यात विजय मिळवला.
साप्ताहिक कार्यात विजयी ठरल्याने टीम A मधील सदस्यांना पहिल्या आठवड्यातील कॅप्टन पदाची उमेदवारी मिळवण्याची संधी मिळाली.
दरम्यान टीम Bला बिग बॉसकडून टीम A मधील काही सदस्यांना कॅप्टन्सीच्या शर्यतीतून बाहेर टाकण्याची संधी देण्यात आली होती.
टीम B कोणकोणत्या सदस्यांकडून उमेदवारीची संधी हिरावून घेणार आणि कोण ठरणार पहिल्या कॅप्टन्सी कार्याचे उमेदवार हे पाहणं फारच औत्सुक्याचं ठरणार आहे.
काल कॅप्टन पदाच्या उमेदवारीच्या शर्यतीमधून किरण माने, रुचिरा जाधव, प्रसाद जावडे आणि रोहित शिंदे हे सदस्य बाद झाले आहेत.
रंजक म्हणजे "आज बिग बॉसच्या घरात पैशाचा पाऊस पडणार आहे. आणि या पाऊसाचा आनंद लुटणाऱ्या उमेदवाराला या सीजनचं पहिलं कॅप्टन पद मिळणार आहे.