मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

BBM4: नऊवारी साडीत घरातील मुलांनी धरला लावणीवर ठेका; नजरेतूनच केलं घायाळ

BBM4: नऊवारी साडीत घरातील मुलांनी धरला लावणीवर ठेका; नजरेतूनच केलं घायाळ

बिग बॉस मराठी 4

बिग बॉस मराठी 4

"ALL IS WELL" म्हणत बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाच्या घराचा दरवाजा उघडला. नुकतंच यंदाच्या सीझनचं पहिले साप्ताहिक कार्य "दे धडक - बेधडक" पहायला मिळालं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sayali Zarad

मुंबई, 6 ऑक्टोबर : "ALL IS WELL" म्हणत बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाच्या घराचा दरवाजा उघडला. नुकतंच यंदाच्या सीझनचं पहिले साप्ताहिक कार्य "दे धडक - बेधडक" पहायला मिळालं. टास्कमध्ये सगळ्याचं सदस्यांचा गोंधळ उडाला. साप्ताहिक कार्याच्या पहिल्या उपकार्यामध्ये सदस्यांमध्ये सुरुवात होताच वादाची ठिणगी पडली. बिग बॉस यांच्या आदेशानंतर देखील सदस्यांमधील ओढाताण थांबली नाही. अशातच आज सदस्य आणखी एक टास्क करताना दिसणार आहे. या टास्कचं नाव आहे 'चान्स पे डान्स'.

'चान्स पे डान्स' टास्कमध्ये स्पर्धकांनी आपल्या डान्सनं सगळ्यांनाच सरप्राईज केलं आहे. अशातच या टास्कमध्ये घरातले मुलं लावणीवर डान्स करत आहे. या  भागातील लावणीवर डान्स करतानाचे काही फोटो समोर आले आहेत. यामध्ये प्रसाद जवादे आणि अक्षय केळकर नववारी साडी नेसून लावणीवर डान्स करत असल्याचं दिसत आहे. त्यांचे हे फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Marathi TRP (@trpmarathi)

सध्या प्रसाद आणि अक्षयचा नववारी लुक प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. त्यांच्या फोटोंवर अनेक लाईक्स आणि कमेंट येत आहेत. दोघेही खूप सुंदर दिसत आहेत. दिवसेंदिवस शोची रंगत वाढत आहे. त्यामुळे पुढे काय होईल, हे पाहण्याची उत्सुकता वाढत आहे.

दरम्यान, 100 दिवस 16 सदस्य कॅमेराच्या काय तर महाराष्ट्राच्या नजरकैदेत असणार असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे कोणते प्रेक्षकांची मनं जिंकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First published:

Tags: Bigg boss marathi, Colors marathi, Marathi entertainment