शिव ठाकरे
मुंबई, 19 ऑक्टोबर: बिग बॉस म्हटलं कि स्पर्धकांमध्ये वाद आणि भांडण आलंच. पण त्यासोबतच या शोमध्ये स्पर्धक एकमेकांच्या प्रेमात देखील पडतात. काही जणांचं नातं घराबाहेर गेल्यावर सुद्धा टिकतं तर काही जणांचं ब्रेकअप होतं. बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सीझनमध्ये अशीच एक जोडी गाजली ती म्हणजे शिव ठाकरे आणि विना जगताप. पण यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. नुकतंच वीणाने याबद्दल स्पष्टच सांगितलं होतं. तर शिवने त्याच्या लव्ह लाईफ विषयी मोठा खुलासा केला होता. पण आता त्यानंतर शिव बिग बॉसच्याच घरात पुन्हा एकदा प्रेमात पडला आहे अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. सलमान खानचा रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’च्या 16व्या सीझनमध्ये बरेच प्रेमाचे अँगल पाहायला मिळत आहेत. एकीकडे शालीन भानोत आणि टीना दत्ता एकमेकांच्या जवळ आलेले दिसतात आणि दुसरीकडे गौतम विज आणि सौंदर्या शर्मा देखील एकमेकांमध्ये हरवलेले दिसतात. तथापि, लोक म्हणतात की हा केवळ त्यांचा गेम प्लॅन आहे. पण आता घरात आणखी एक जोडपं तयार होताना दिसत आहे, ज्यांची नावं ऐकून तुम्हाला धक्का बसेल. शिव ठाकरे आणि सुंबुल तौकीर खान अशी त्यांची नावे आहेत. शिव ठाकरे आणि सुंबुल तौकीर खान अशी त्यांची नावे आहेत. त्यांचा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी त्यांची जोडी बनवली आहे. हेही वाचा - Shiv Thakare: ‘आतापर्यंत माझ्या 169 गर्लफ्रेंड झाल्या’; शिव ठाकरे म्हणाला, माझं आयुष्य… बिग बॉस मराठीच्या घरात शिव आणि वीणा जगताप यांची जोडी खूपच गाजली. पण हे नातं फार काळ टिकलं नाही. वीणानंतर शिव आता बिग बोसच्याच घरात दुसऱ्या एका अभिनेत्रीच्या प्रेमात असल्याच्या चर्चाना उधाण आलं आहे. सुंबुल तौकीर बिग बॉसच्या घरातील गाजलेली स्पर्धक आहे. दरम्यान, तिचे आणि घराचा नुकताच झालेला कॅप्टन शिव ठाकरे यांचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे पाहिल्यानंतर चाहते म्हणत आहेत की दोघेही हळूहळू एकमेकांच्या जवळ येत आहेत. प्रेमात पडत आहेत.
एका व्हिडिओमध्ये शिव ठाकरे आणि सुंबूल तौकीर खान एकमेकांना डान्स स्टेप्स शिकवताना दिसत आहेत. बॅकग्राऊंडला गाणं लावून चाहते आपापल्या पद्धतीने हा व्हिडिओ शेअर करत आहेत. ही ‘नवी जोडी’ चाहत्यांना खूप आवडत आहे. त्यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोघे सोफ्यावर बसून बोलत असल्याचे दिसत आहे. त्यांच्यात खरंच काही प्रेमकहाणी असेल की नाही, हे येणारा काळच समजेल.
बिग बॉस 16 च्या वीकेंड का वारमध्ये सुंबुलचे वडील आले तेव्हा त्यांनी शिव ठाकरेंचे कौतुक केले. शिवाने ज्या प्रकारे माफी मागितल्यानंतर सुंबुलच्या डोक्यावर हात ठेवला होता ते पाहून सुंबुलच्या वडिलांनी तो खरा मराठा असल्याचे सांगितले होते.