JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Shiv Thakare: 'आतापर्यंत माझ्या 169 गर्लफ्रेंड झाल्या'; शिव ठाकरे म्हणाला, माझं आयुष्य...

Shiv Thakare: 'आतापर्यंत माझ्या 169 गर्लफ्रेंड झाल्या'; शिव ठाकरे म्हणाला, माझं आयुष्य...

बिग बॉसच्या घरात शिव आणि वीणाची लव्हस्टोरी चांगलीच गाजली. पण विणाच्या आधी झालेल्या 169 गर्लफ्रेंडचं सिक्रेट शिवनं सांगितलं आहे.

जाहिरात

शिव ठाकरे

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 ऑक्टोबर : आपला माणूस अर्थात बिग बॉस मराठी 2 चा विजेता शिव ठाकरे सध्या हिंदी बिग बॉसमध्ये जाऊन सगळ्यांची मनं जिंकत आहे.  शिवनं पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. शिवच्या समर्थनार्थ चाहत्यांनी बाईक रॅली देखील काढल्या होत्या. संपूर्ण महाराष्ट्र शिवच्या खरेपणाच्या  आणि प्रामाणिकपणाच्या प्रेमात पडला आहे. मात्र “माझं आयुष्य हे ओपन बुक आहे”, असं म्हणत शिवनं बिग बॉस 16मध्ये जाण्याआधी महत्त्वाची गोष्टी सांगितल्या आहेत. जी त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी आहे. बिग बॉस मराठीमध्ये असताना शिव आणि वीणाचे जाडी जमली होती. मात्र काही महिन्यातच दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगल्या. अशातच आता बिग बॉस हिंदीमध्ये जाताना शिवनं त्याला 169 गर्लफ्रेंड होत्या असा धक्कादायक खुलासा केला आहे. बिग बॉसच्या घरात जाण्याआधी झालेल्या मुलाखतीत शिवनं अनेक गोष्टी सांगितल्या. घरात तो कसा खेळणार आहे? सगळ्या चॅलेंजला समोरं  जाण्यासाठी तो तयार आहे का असा प्रश्न त्याला विचारला असता त्यानं खूप स्पष्ट उत्तर दिलं. हेही वाचा - Bigg Boss Marathi: शिव आणि वीणा या लव्ह बर्ड्सचं पुढे काय झालं? अभिनेत्रीचं उत्तर ऐकून बसेल धक्का शिवनं म्हटलंय, “मी माइंडनं खूप क्लिअर आहे.  माझं आयुष्य ओपन बुक आहे. माझ्या आयुष्यातील कोणत्याच गोष्टी मी लपवून ठेवल्या नाहीत. माझ्या 169गर्लफ्रेंड पासून मी सगळं काही बिग बॉसमध्ये सांगितलं आहे.  माझ्या पहिल्या गर्लफ्रेंडबरोबर बोलणं झालं कोणाला सप्राइज केलं सगळं मी सांगितलं आहे. माझं पुस्तक खुल आहे. तुम्ही मला काहीही विचारा मी सहज उत्तर देईन” .

संबंधित बातम्या

शिवच्या खुलेपणाचं आणि सच्चेपणाचं सर्वांनी कौतुक केलं आहे. खेळाकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा असल्यानं त्यानं आपला माणूस असा शिक्का मिरवत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. हिंदी बिग बॉस शिव ठाकरेच जिंकणार असं त्याच्या चाहत्यांनी आधीच घोषिक केलं आहे. शिव ठाकरे बिग बॉस हिंदीमध्ये गेल्यानंतर पहिल्याच आठवड्यात सलमान खाननंही शिवचं कौतुक केलं. शिव चांगलं खेळतोस असं म्हणत शिवला काही टीप्स दिल्या. त्यानंतर मात्र शिव ठाकरे सोशल मीडियावर जवळपास 2-3 दिवस ट्रेंडमध्ये होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या