मुंबई 28 मार्च**:** होळी हा देशातील सर्वाधिक लोकप्रिय सणांपैकी एक म्हणून ओळखला जातो. सर्वसामान्य लोकांपासून अगदी सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण मोठ्या उत्साहात हा सण साजरा करतात. विविध रंगांची उधळण करुन या सणाचा आनंद घेतला जातो. अगदी चित्रपटांमध्ये देखील विविध प्रकारची गाणी गाऊन होळी सेलिब्रेट केली जाते. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल होळीच्या गाण्यांमुळं काही पडणारे चित्रपट देखील सुपरहिट झाले आहेत. पाहूया बॉलिवूडपटांचं नशीब बदलणारी काही होळीची गाणी… लहु मूह लग गया… रामलीला चित्रपटातील हे गाणं सुपरहिट ठरलं होतं. अनेक ठिकाणी होळीच्या निमित्तानं हे गाणं वाजवलं जातं.
सोनी अखियोंवाली – मोहबत्तें या चित्रपटातील सोनी अखियोंवाली हे गाणं सुपरहिट ठरलं होतं. या गाण्यामुळं या चित्रपटात एक मोठा ट्विस्ट येतो. कधीनव्हे ते पहिल्यांदाच गुरुकूलमध्ये होळीचा सण साजरा केला जातो.
रंग बरसे – सिलसिला चित्रपटातील हे गाणं आजवरच्या सर्वाधिक लोकप्रिय होळी गाण्यांपैकी एक आहे. या गाण्यामुळंच सिलसिला हा चित्रपट आजही प्रेक्षकांमध्ये चर्चेत असतो.
होली के दिन दिल खिल जाते है – शोले चित्रपटातील गे गाणं आजवरच्या सर्वाधिक लोकप्रिय होळी गाण्यांपैकी एक आहे. विविध ठिकाणी होळी खेळताना लोक या गाण्यावर थिरकतात. आज 45 वर्षानंतरही हे गाणं तितकच लोकप्रिय आहे.
बॉलिवूड सिनेसृष्टीत अशी अनेक गाणी आहे ज्यामुळं होळीचा आनंद द्विगुणीत होतो. या गाण्यांमुळं ते चित्रपट आजही प्रेक्षकांमध्ये चर्चेत असतात.