JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Athiya Shetty- KL Rahul: अथियाच्या लग्नादिवशी अजय देवगणची खास पोस्ट; सुनील शेट्टींना म्हणाला, 'अण्णा तुम्हाला...'

Athiya Shetty- KL Rahul: अथियाच्या लग्नादिवशी अजय देवगणची खास पोस्ट; सुनील शेट्टींना म्हणाला, 'अण्णा तुम्हाला...'

अथिया आणि केएल राहुल यांच्या लग्नापूर्वीच्या विधी मोठ्या थाटात पार पडत असताना काल अभिनेते सुनील शेट्टी यांनी लेकीच्या लग्नाबद्दल मोठी माहिती दिली होती. आता आज बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने नव्या जोडप्यासाठी खास पोस्ट केली आहे.

जाहिरात

अजय देवगण-सुनील शेट्टी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 जानेवारी: बॉलिवूड अभिनेते सुनील शेट्टीची मुलगी आणि अभिनेत्री  अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल यांच्या लग्नाची तयारी सुरु झाली आहे. दोघे येत्या आज म्हणजेच 23 जानेवारीला लग्नगाठ बांधणार आहेत. आता त्याआधी तयारी जोरात सुरु असून त्यांच्या लग्नमंडप देखील सजला आहे. एवढंच  नाही तर त्यांच्या संगीत नाईटचे व्हिडीओ देखील समोर आले आहेत. अथिया आणि केएल राहुल यांच्या लग्नापूर्वीच्या विधी मोठ्या थाटात पार पडत असताना काल अभिनेते सुनील शेट्टी यांनी लेकीच्या लग्नाबद्दल मोठी माहिती दिली होती. आता आज बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने नव्या जोडप्यासाठी खास पोस्ट केली आहे. 2019 पासून डेट करत असलेले केएल राहुल आणि अथिया शेट्टी आज 23 जानेवारी 2023 रोजी लग्न करणार आहेत. सुनील शेट्टी यांच्या खंडाळा फार्महाऊसवर लग्न समारंभ आणि प्री-वेडिंग फंक्शन्स पार पडत आहेत. यानिमित्ताने त्यांच्या फार्महाऊसवर जोरदार हालचाली सुरू आहेत. लग्नाला उपस्थित राहण्यासाठी पाहुणे पोहोचत आहेत. दरम्यान, अजय देवगणने अथिया शेट्टीच्या लग्नावर सुनील शेट्टीला सोशल मीडियावर काही संदेश पाठवला आहे. हेही वाचा - Sunil Shetty: लेकीच्या लग्नासाठी सुनील शेट्टी तयार; समोर येत मराठीत म्हणाले ‘उद्या मुलांना घेऊन…’ अजय देवगणने सुनील शेट्टीला मुलगी अथियाच्या लग्नाबद्दल ट्विटरवर शुभेच्छा दिल्या आहेत. अजय देवगणने ट्विट करताना अथिया आणि केएल राहुलचा एक अतिशय छान फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, ‘माझे प्रिय मित्र सुनील शेट्टी आणि मीना शेट्टी यांची मुलगी अथिया शेट्टी के.एल. म्हणून त्यांचे अभिनंदन. ती राहुलसोबत लग्न करणार आहे. दाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा. आणि या प्रसंगी तुमच्यासाठी अण्णा तुम्हाला खास शुभेच्छा. अजयचे हे ट्विट सध्या चांगलेच व्हायरल होत आहे.

संबंधित बातम्या

काल रात्री अथिया आणि के.एल. राहुलचा संगीत सोहळा ठेवण्यात आला होता. हा विवाहपूर्व सोहळाही फक्त खंडाळा फार्महाऊसवरच होता. आज म्हणजेच 23 जानेवारीला दोघेही लग्नबंधनात अडकणार आहेत. मात्र, लग्नापूर्वी कुटुंबीयांनी या जोडप्यासाठी हळदी समारंभाचे आयोजन केले आहे, ज्यामध्ये जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित राहणार आहेत.

लग्नाच्या एक दिवसआधी सुनील यांनी अथियाच्या लग्नाबद्दल मराठीत माहिती दिली होती. सध्या त्यांच्या व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत. आथिया आणि राहुलच्या लग्नाच्या या पार्टीत बॉलिवूड स्टार्सशिवाय काही क्रिकेटर्सही हजेरी लावत असल्याचे सांगण्यात येत आहे. पाहुण्यांना लग्नात फोटो काढता येणार नाहीत. फोन सोहळ्यापासून दूर ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. शिवाय अनेक बॉलिवूडकरांना लग्नाचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार लग्नाच्या काही आठवड्यांनी सेलिब्रिटींलाठी मोठ्या पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. आता प्रत्येकाला अथिया आणि केएल राहुल यांना पती-पत्नीच्या रुपात पाहण्याची इच्छा चाहत्यांच्या मनात शिगेला पोहोचली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या