JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / अनुष्का शर्मा आणि साक्षी धोनी होत्या वर्गमैत्रीणी; शाळेतील जुने फोटो होतायेत व्हायरल

अनुष्का शर्मा आणि साक्षी धोनी होत्या वर्गमैत्रीणी; शाळेतील जुने फोटो होतायेत व्हायरल

अनुष्का आणि साक्षी यांचे काही जुने फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तर एक फोटो त्यांचा शोळेतील अगदी शिशू वर्गातील आहे. त्यामुळे या दोघींमध्ये आधीच कनेक्शन होत हे पाहून त्यांच्या चाहत्यांनाही आनंदाचा सुखद धक्का बसला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 15 मे : भारतीय क्रिकेट टिमचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आणि पूर्व कॅप्टन महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni)  यांच्या पत्नीही एकाच शाळेत होत्या. अनुष्का शर्मा (Anushka Sharma) ही बॉलिवूडची एक नामवंत अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. पण विराट कोहली सोबत विवाह केल्यानंतर ती क्रिकेट विश्वाशी अप्रत्यक्षरित्या जोडली गेली आहे. अनेकदा क्रिकेटर्स पार्टी, स्टेडियम मध्ये ती स्पॉट होते. तर दुसरीकडे साक्षी धोनीही (Sakshi Dhoni) मीडियात फारच लोकप्रिय आहे. विशेष म्हणजे या दोघीही एकाच शाळेत होत्या. (Anushka Sharma and Sakshi Singh Dhoni were classmates)

माधुरी कशी पडली श्रीराम नेनेंच्या प्रेमात?; पाहा डॉक्टर आणि अभिनेत्रीची Love Story

अनुष्का आणि साक्षी यांचे काही जुने फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तर एक फोटो त्यांचा शोळेतील अगदी शिशू वर्गातील आहे. त्यामुळे या दोघींमध्ये आधीच कनेक्शन होत हे पाहून त्यांच्या चाहत्यांनाही आनंदाचा सुखद धक्का बसला आहे.

काही फोटो हे त्यांच्या शाळेतील असून त्या अनोख्या वेशभूषेत दिसत आहेत. अनुष्का शर्माचे वडील कर्नल (रिटायर्ड) अजय कुमार शर्मा इंडियन आर्मी मध्ये होते. नोकरी साठी त्यांना देशातील विविध ठिकाणी काम कराव लागलं. तेव्हा अनुष्का फार लहान होती. जेव्हा अनुष्काच्या वडिलांची आसाम मध्ये पोस्टींग झाली तेव्हा अनुष्का सेंट मेरी स्कूल मार्गेरिटा शिक्षण घेऊ लागली, तेव्हाच साक्षी देखिल त्याच शाळेत शिकत होती.

निधी अग्रवालचा ‘मुन्ना’ हरवलाय; शोधून देणाऱ्याला मिळणार 1 लाखांचं बक्षिस

अनुष्काने देखिल या गोष्टीचा खुलासा केला होता. एका मुलाखतीत अनुष्काने आपण साक्षीचे क्लासमेट होतो हे सांगितलं होते. अनुष्का आणि विराट कोहली हे नुकतेच आई बाबा झाले आहेत. तर धोनी आणि साक्षी देखिल एका मुलीचे आई बाब आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या