Home /News /entertainment /

माधुरी कशी पडली श्रीराम नेनेंच्या प्रेमात?; पाहा डॉक्टर आणि अभिनेत्रीची Love Story

माधुरी कशी पडली श्रीराम नेनेंच्या प्रेमात?; पाहा डॉक्टर आणि अभिनेत्रीची Love Story

जिच्यावर लाखो लोक जीव टाकतात अशामाधुरीचं हृदय मात्र डॉ. श्रीराम नेने(Dr. Shriram Nene)यांनी जिंकलं. माधुरीनं स्वत: एका मुलाखतीत तिच्या प्रेमकथेविषयी सांगितलं होतं.

    मुंबई 15 मे: बॉलिवूडची (Bollywood) धकधक गर्ल, सुपरस्टारमाधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आज 54 वर्षांची झाली आहे. देशभरातील तिचे चाहते तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. माधुरीचा जन्म महाराष्ट्रात (Maharashtra) एका मराठी कुटुंबात 15 मे 1967 रोजी झाला होता. 80 आणि 90 च्या दशकात ती बॉलिवूडच्या अनेक हिट चित्रपटांमध्ये दिसली. यात तेजाब, दिल, साजन, बेटा, राम लखन, परिंदा, दिल तो पागल है, हम आपके हैं कौन, खलनायकया चित्रपटांचा समावेश आहे. अभिनय आणि सौंदर्याशिवाय नृत्यकौशल्य ही माधुरीची विशेषओळखआहे. वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षापासून तिनं नृत्य शिकण्यास सुरवात केली आणि वयाच्या आठव्या वर्षीतीकथक नृत्यातपारंगत झाली होती. जिच्यावर लाखो लोक जीव टाकतात अशामाधुरीचं हृदय मात्र डॉ. श्रीराम नेने(Dr. Shriram Nene)यांनी जिंकलं. माधुरीनं स्वत: एका मुलाखतीत तिच्या प्रेमकथेविषयी सांगितलं होतं. त्यांची पहिली भेट अगदी योगायोगानं झाली होती; पण पहिल्याच भेटीत दोघांची मैत्री झाली. यादोघांची पहिली भेट लॉस एंजेलिसइथं माधुरीच्या भावाच्या पार्टीमध्ये झाली. विशेष म्हणजे तेव्हा माधुरी सुपरस्टार होती; पण डॉ. नेने यांना याची काहीच कल्पना नव्हती. माधुरी एक अभिनेत्री आहे आणि ती हिंदी चित्रपटांमध्ये काम करते, हे देखील त्यांना माहीत नव्हते. एकदा डॉ.नेने यांनी माधुरीला आपल्याबरोबर डोंगरावर बाइकवरून येण्यासंबंधी विचारलं. माधुरीनं त्याला होकार दिला. पण बाईकवरून डोंगरावर जाणं फार कठीण होतं. मात्र इथूनच माधुरी आणि श्रीराम नेने एकमेकांच्या अधिकजवळ आले आणि त्यांची मैत्री प्रेमात बदलली. यानंतर दोघांनी काही काळ एकमेकांना डेट केलं आणि मग लग्न करण्याचा निर्णय घेतला. HBD Special: या अभिनेत्रीच्या नकारामुळं Madhuri Dixit झाली ‘धक धक गर्ल’ माधुरी बॉलिवूडमध्ये आली तेव्हा ती अभिनयाबरोबरच तिच्या नृत्यासाठीही प्रसिद्ध झाली. कोरिओग्राफर सरोज खान ज्यांना माधुरी आपला नृत्याती लगुरु मानते, त्यांच्यामुळे माधुरी लानृत्यासाठी प्रसिद्धी मिळाली. सरोज खान यांचंगेल्या वर्षी निधन झालं. सध्या माधुरी डान्स रिअॅलिटी शो ‘डान्स दिवाना3’ मध्ये परीक्षक म्हणून कार्यरत आहे. माधुरीने मुंबईतील महाविद्यालयातून मायक्रोबायोलॉजीचे शिक्षणघेतलं असून,आपणअभिनयातकारकीर्द करू असं तिला कधीही वाटलं नव्हतं. 1984 मध्ये प्रदर्शित झालेल्याराजश्री प्रॉडक्शनच्या‘अबोध’ याचित्रपटात ती पहिल्यांदा दिसली.यात तिच्याबरोबरप्रसिद्ध बंगाली अभिनेता तपस पॉल मुख्य भूमिकेत होता. हा चित्रपट फ्लॉप झाला;परंतु समीक्षकांनीमाधुरीच्या अभिनयाचं कौतुक केलं.माधुरीला खरी ओळख1988 मध्ये आलेल्या एन. चंद्रा दिग्दर्शित ‘तेजाब’(Tejab)या चित्रपटातून मिळाली. या चित्रपटातील तिच्यामोहिनीच्या भूमिकेनंप्रेक्षकांना मंत्रमुग्धकेलं.या चित्रपटाततिच्यासोबतअनिल कपूर मुख्य भूमिकेत होता. हा चित्रपटतुफान गाजला आणि माधुरीहिंदीचित्रपटसृष्टीतीलसुपरहिट अभिनेत्री बनली. यानंतर माधुरीनं मागंवळून पाहिलंनाही.
    First published:

    Tags: Bollywood actress, Entertainment, Madhuri dixit

    पुढील बातम्या