मुंबई 15 मे: सेलिब्रिटींचं प्राणी प्रेम हे जगजाहीर आहे. अनेक सेलिब्रिटी आपल्या घरात कुत्रे, मांजरींपासून अगदी सापांपर्यंत विविध प्रकारचे प्राणी पाळतात. मुन्ना मायकल या चित्रपटातून नावारुपास आलेल्या निधी अग्रवालनं (Niddhi Agerwal) देखील आपल्या घरात एक कुत्रा पाळला होता. तिच्या कुत्र्याचं नाव कोको असं आहे. मात्र तिचा लाडका कोको आता बेपत्ता झाला आहे. पोलीस सध्या या प्राण्याचा शोध घेत आहेत. मात्र तो अद्याप सापडलेला नाही. (Niddhi Agerwal loss her Coco) परिणामी चिंतेत असलेल्या निधीनं कोकोला शोधून काढणाऱ्या व्यक्तीसाठी तब्बल 1 लाख रुपयांच्या बक्षिसाची घोषणा केली आहे.
ओडिसा टिव्हीनं दिलेल्या वृत्तानुसार निधीकडे गोल्डन रिट्रीव्हर जातीचा एक पाळीव कुत्रा आहे. त्याच्या गळ्यात गुलाबी रंगाचा पट्टा आहे. त्यावर डायमंड स्टड्स आहेत. यामुळं तो चटकन ओळखला जाऊ शकतो. तो केवळ आठ वर्षांचा आहे. शिवाय त्याला हृदयविकाराचा देखील त्रास आहे त्यामुळं निधी सध्या चिंतेत आहे. कोको 14 मार्च रोजी सकाळी साडेसातच्या दरम्यान देवट प्लाझा, रेसिडेन्सी रोड, शांतला नगर, अशोकनगर बंगळुरू येथून हरवला आहे. अन् जो कोणी त्याला शोधून काढेल त्या व्यक्तीला निधी एक लाख रुपयांचं बक्षिस देणार आहे. याबाबत तिनं सोशल मीडियावर एक पोस्ट देखील केली होती. या पोस्टद्वारे तिनं कोकोला शोधण्यासाठी चाहत्यांची मदत मागितली होती.
HBD Special: या अभिनेत्रीच्या नकारामुळं Madhuri Dixit झाली ‘धक धक गर्ल’
निधी अग्रवाल ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ‘मिस्टर मंजु’ या तेलुगु चित्रपटातून तिने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. हा सुपरहिट चित्रपटानंतर बॉलिवूड निर्मात्याचं देखील लक्ष तिच्याकडे वळलं. 2017 मध्ये ‘मुन्ना मायकल’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. परंतु हा चित्रपट तिकिट बारीवर फ्लॉप ठरला. त्यानंतर निधीनं पुन्हा एकदा आपलं लक्ष दाक्षिणात्य चित्रपटांकडे वळवलं. गेल्या काही काळात ‘स्मार्ट शंकर’, ‘भूमी’, ‘निनू कुरी’, ‘मायावन’ यांसारख्या काही चित्रपटांमध्ये झळकली. चित्रपटांसोबतच ‘बिग बॉस’ तमिळमध्येही ती झळकली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actress, Entertainment