सैफ अली खान - अमृता सिंग
मुंबई, 31 मार्च : सैफ अली खान आज करीना कपूरसोबत आनंदी जीवन जगत आहे. पण त्याच्या खाजगी आयुष्यामुळे तो कायमच चर्चेत राहिला आहे. सध्या तो वैयक्तिक आयुष्यात करीना कपूर आणि दोन मुलं तैमूर आणि जेह सोबत आनंदाने दिवस घालवत आहे. त्याच्या कुटुंबाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण त्याचबरोबर त्याची पहिल्या पत्नीची मुलं देखील चर्चेत असतात. सैफ अली खानने आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या अमृता सिंगशी लग्न केलं होतं. पण त्यांचं हे नातं फार काळ टिकू शकलं नाही. या दोघांच्या घटस्फोटामागे नेमकं काय कारण होतं हे जाणून घ्या…. सैफ अली खान आणि अमृता सिंग यांनी 1991 मध्ये लग्न केले होते. अमृता सिंग सैफ पेक्षा तब्बल १३ वर्षांनी मोठी होती. या दोघांच्या लग्नाच्या बातमीने सगळ्यांनाच आश्चर्यचकित केले होते. या दोघांचं नातं प्रेमाने जुळलेलं होतं. पण प्रेम जिथे आहे तिथे मत्सर आलाच. या दोघांच्या नात्याचंही तेच झालं. एका अभिनेत्रीमुळे दोघांच्या नात्यात दरी पडली असं म्हटलं जातं. कमल हासनने नाकारलेला चित्रपट सनी देओलसाठी ठरला लकी; ‘त्या’ सिनेमानं बदललं अभिनेत्याचं नशीब या दोघांच्या नात्यात दुरावा का आला याचा खुलासा खुद्द सैफ अली खानने केला होता. यामागचं कारण होतं सैफचा इतर अभिनेत्रींसोबत मोठ्या पडद्यावर केलेला रोमान्स. या दोघांचं लग्न झालं तेव्हा सैफ अली खान बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जायचा. त्याच्यासोबत अनेक अभिनेत्रींना चित्रपटात कास्ट केलं जायचं. मग त्यात रोमँटिक सीन्स देखील असायचे. सैफला मोठ्या पडद्यावर रोमान्स करताना पाहून अमृता सिंग मात्र चांगलीच चिडायची. पण तेव्हा ही गोष्ट फक्त चिडचिड एवढ्यापुरती मर्यादित राहिली नाही, तर त्याचा तिला खूप राग यायचा. ती खूप रडायची आणि ओरडायची. तिने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिला सैफच्या या गोष्टीचा इतका राग यायचा की तिला सैफला फ्राईंग पॅनने मारावं वाटायचं. हसत हसत सैफ म्हणाला होता, ‘तिने तेही केलेलं आहे.’
हळूहळू या गोष्टी त्यांच्या नात्यात विषासारख्या मिसळल्या. मुलगा इब्राहिमच्या जन्मानंतर सैफचे नाव परदेशी मॉडेल रोजासोबत जोडले गेले होते. आणि नंतर जेव्हा हे अमृताच्या कानावर पोहोचले तेव्हा तिला ते सहन झाले नाही. त्यानंतर त्यांचे नाते सुधारण्याऐवजी बिघडतच गेले. अमृता आणि सैफ रोज भांडू लागले. सारा अली खान त्यावेळी 8-9 वर्षांची होती आणि तिला रोज घरात असेच वातावरण दिसायचे. मग डोक्यावरून पाणी जाऊ लागल्यावर सैफनेच पुढे जाऊन घटस्फोटाची चर्चा सुरू केली. अमृता त्यावेळी घटस्फोटासाठी तयार नव्हती असे म्हटले जाते पण सैफच्या म्हणण्यानुसार त्या नात्यात काहीच उरले नव्हते त्यामुळे हे नातं संपवनचं त्यांच्यासाठी चांगलं होतं. अखेर दोघांच्याही वाटा वेगवेगळ्या झाल्या.