मावशीच्या लग्नासाठी मुंबईत आली प्रियांकाची लेक?

प्रियांका चोप्रा सध्या तिच्या बॉलिवूडबद्दल केलेल्या विधानांमुळं चर्चेत आहे.


तर दुसरीकडे प्रियांकाची बहीण परिणितीच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

अशातच आता प्रियांका परिवारासहित मुंबईत दाखल झाली आहे.

मध्यंतरी प्रियांका मुंबईत एकटीच आली होती.

प्रियांकाची लेक पहिल्यांदाच भारतात आली आहे.

 प्रियांका तिचा पती निक जोनस आणि मुलगी मालतीसोबत मुंबई विमानतळावर स्पॉट झाली @viralbhayani

 सगळ्यांच्या नजरा चिमुकल्या मालतीवर खिळल्या होत्या.

प्रियांका भारतात येण्याचं कारण अजून समोर आलं नाही.

पण ती परिणितीच्या लग्नसाठीच भारतात आल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.