जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / कमल हासनने नाकारलेला चित्रपट सनी देओलसाठी ठरला लकी; 'त्या' सिनेमानं बदललं अभिनेत्याचं नशीब

कमल हासनने नाकारलेला चित्रपट सनी देओलसाठी ठरला लकी; 'त्या' सिनेमानं बदललं अभिनेत्याचं नशीब

राजकुमार संतोषींचा मोठा चित्रपट कमल हासनने नाकारला होता

राजकुमार संतोषींचा मोठा चित्रपट कमल हासनने नाकारला होता

कमल हासन यांनी नाकारलेल्या चित्रपटात काम करून सनी देओलचं नशीबच चमकलं. कोणता होता तो चित्रपट, कमल हसनने त्याला का नकार दिलेला जाणून घेऊया तो रंजक किस्सा…

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 31 मार्च :  बॉलीवूडमध्ये कोणाला कोणता चित्रपट कधी मिळेल हे सांगता येत नाही. अनेकदा असे घडते जेव्हा अभिनेत्यांच्या चुकीच्या निवडीमुळे चित्रपट फ्लॉप ठरतो. किंवा अभिनेते एखादा चित्रपट नाकारतात आणि तो नंतर हिट ठरतो.  असाच काहीसा प्रकार साऊथचा मोठा अभिनेता कमल हासनच्या बाबतीत घडला होता. त्याने राजकुमार संतोषी यांचा एक  चित्रपट करायला नकार दिला होता जो नंतर बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट ठरला. या चित्रपटात कमल हासनची जागा बॉलिवूडचा प्रसिद्ध स्टारकिड सनी देओलने घेतली होती. कमल हासन यांनी नाकारलेल्या चित्रपटात काम करून सनी देओलचं नशीबच चमकलं. कोणता होता तो चित्रपट, कमल हसनने त्याला का नकार दिलेला जाणून घेऊया तो रंजक किस्सा… चित्रपट दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी 15 नोव्हेंबर 1996 रोजी ‘घातक’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आणला. दमदार कथानकामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. 44 कोटींचा व्यवसाय करून हा चित्रपट त्या वर्षातील चौथा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. चित्रपटाचा सर्वात जास्त फायदा कोणाला झाला असेल तर तो मुख्य अभिनेता सनी देओलला. पण नशिबाने साथ दिली नसती तर हा चित्रपट त्याच्या हाती लागला नसता. बेरोजगारीला कंटाळून सोडणार होते अभिनय; दिलीप जोशींना कशी मिळाली जेठालालची भूमिका? ‘घातक’ या अॅक्शनपटासाठी राजकुमार संतोषीची पहिली पसंती साऊथचा सुपरस्टार कमल हासन होता. चित्रपटाबाबत कमल हसन यांच्याशी चर्चाही झाली होती. प्रदीर्घ ब्रेकनंतर तो या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार होता. अशा परिस्थितीत संतोषीच्या वतीने पोस्टर छापण्यात आले होते, ज्यावर ‘हिंदी पडद्यावर वेलकम बॅक’ असे लिहिले होते. पण नंतर काही कारणांमुळे कमल हासन या चित्रपटातून बाहेर पडला आणि त्याच्या हातून एक हिट चित्रपट निसटला.

News18

जेव्हा कमल हसन या चित्रपटातून दूर गेला तेव्हा राजकुमार संतोषी खूप निराश झाले होते. यानंतर संतोषी या अॅक्शनपटात कोणाला कास्ट करायचे याचा विचार करू लागले. त्यांनी 1990 मध्ये ‘घायल’ आणि 1993 मध्ये सनी देओलसोबत ‘दामिनी’ हे चित्रपट बनवले होते. त्यामुळेच त्यांनी घातक साठी पुन्हा एकदा सनीशी संपर्क साधला आणि त्यालाही स्क्रिप्ट आवडली.

News18लोकमत
News18लोकमत

सनीने ‘घातक’ या सिनेमात आपली भूमिका अतिशय चोख बजावली आणि हा चित्रपट त्याच्यासाठी जॅकपॉट ठरला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूपच हिट ठरला. यानंतर सनीकडे अनेक चित्रपटांच्या संधी चालून आल्या.  या चित्रपटात मीनाक्षी शेषाद्री, अमरीश पुरी आणि डॅनी महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात