JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / आपल्या जिजाचा स्वॅगच न्यारा ! अक्षया देवधरने शेअर केलेला हा VIDEO पाहिलात का?

आपल्या जिजाचा स्वॅगच न्यारा ! अक्षया देवधरने शेअर केलेला हा VIDEO पाहिलात का?

अक्षया देवधरने (Akshaya Deodhar) जिजाचा स्वॅग असं कॅप्शन देत एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे. एकदा पाहाच तुमची लाडकी जिजा नक्की करतेय तरी काय?

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 05 डिसेंबर: तुझ्यात जीव रंगला (Tujhat Jeev Rangla) ही मालिका प्रेक्षकांच्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. राणा आणि जीजा यांची लव्हस्टोरी प्रेक्षकांना बघायला प्रेक्षकांना अतिशय आवडत आहे. या मालिकेत आत्तापर्यंत अनेक ट्विस्ट येऊन गेले आहेत. हार्दिक जोशी, अक्षया देवधर (Akshaya Deodhar) यांच्या भूमिका प्रेक्षकांना विशेष आवडल्या आहेत. तसंच  खलनायिका साकारणारी धनश्री ही अभिनेत्रीही प्रेक्षकांना अतिशय आवडत आहे. सुसंस्कृत घरतील, शिक्षिका असलेली अंजली सध्या जीजा म्हणून मालिकेमध्ये वावरत आहे. जीजा आणि राणा यांच्यातलं प्रेम हळूहळू फुलणार आहे. अंजलीची भूमिका आणि जीजाची भूमिका या दोन अत्यंत वेगळ्या भूमिका एकाच मालिकेमध्ये अक्षयाने साकारल्या आहेत. अक्षयाने जीजाच्या वेशातला एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ती एका टेरेसवर उभी आहे आणि सुरुवातीला सूर्य दिसत आहे. नंतर त्याच्यावर काळे ढग दिसत आहेत. असं दाखवण्यात आलं आहे. अक्षया हाताने ढगांना खाली खेचते असं या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलं आहे. या व्हिडीओला अक्षया देवधरने जीजाचा स्वॅग असं नाव दिलं आहे.

अक्षया देवधर (Akshaya Deodhar) सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या