मुंबई 29 एप्रिल: चाहते आपल्या आवडत्या सेलिब्रिटीसाठी काय करतील याचा काही नेम नाही. असचं अभिनेत्री , डान्सर नोरा फतेही (Nora Fatehi) सोबत घडलं आहे. नोराचा जगभरात मोठा चाहता वर्ग आहे. तर बॉलिवूडमधून तिला मोठी ओळख मिळाली त्यामुळे भारतात तिचे अनेक चाहते आहेत. तर एका चाहत्याने चक्क तिचा टॅटू आपल्या हातावर गोंधवला आहे. नोरा मुंबई एअरपोर्टवरुन परतत असताना एका फॅन ने तिला गाठंल. नोराला मीडिया मार्फत एक फॅन तिला भेटण्यासाठी आला आला असल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर नोराही त्याला भेटायला गेली. तर नोराचा हा चाहता चक्क औरंगाबाहून तिला भेटायला आला होता. त्यानंतर त्या चाहत्याने नोराला तिच्या चेहऱ्याचा काढलेला टॅटू दाखवला व हे पाहून नोराही भारावून गेली. तर तिला काय बोलावं हे सुचत नव्हतं. तर तिने सो कुल अशी प्रतिक्रिया त्या चाहत्याला दिली. (a fan tattoed Nora’s face)
नोराचा आणि तिच्या चाहत्याचा हा एअरपोर्टवरील हा व्हिडिओ चांगलाचा व्हायरल होत आहे. त्या फॅन ने एक केक देखिल नोरासाठी आणला होता. त्यानंतर नोराने तो केक कट केला.
Couple goals देतायेत मिलिंद सोमण आणि अंकिताचे PHOTO
या व्हिडिओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. तर काही युझर्सनी त्या फॅन ला ट्रोल देखिल केलं आहे. सध्याच्या कोरोनाच्या काळात नियम मोडत हे सगळं करणं काही युझर्स ना आवडलं नाही. एकाने लिहील, “किती मुर्खपणा आहे… लोक त्यांची बुद्धी हरवून बसले आहेत, या लोकांना काउन्सेलिंग सोबत लसीकरणाची गरज आहे.”
Irrfan Khan Death Anniversary; पाहा अष्टपैलू अभिनेत्याचे कधीही न पाहिलेले फोटो
यानंतर नोरानेही कमेंट सेक्शन मध्ये (Nora commented) येत कमेंट केली, असो, “हे सरप्राइज खुपच सुंदर होत, इश्वर त्याला आशिर्वाद देवो.”