JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / बाहुबलीमधील 'भल्लालदेव' गेला हनीमूनला; पत्नीसोबतचे HOT PHOTOS व्हायरल

बाहुबलीमधील 'भल्लालदेव' गेला हनीमूनला; पत्नीसोबतचे HOT PHOTOS व्हायरल

बाहुबली सिनेमामधील भल्लालदेव अर्थात अभिनेता राणा दग्गुबाती (Rana Daggubati) आपली पत्नी मिहीका बजाजसोबत हनीमूनला गेला आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 ऑक्टोबर: अभिनेता राणा दग्गुबती (Rana Daggubati) आणि त्याची गर्लफ्रेंड मिहिका बजाज (Miheeka Bajaj) यांचं नुकतंच लग्न झालं. हे दोघं सध्या हनीमूनला गेले आहेत. मिहिकाने आपल्या सोशल मीडियावर त्यांच्या हनीमूनचे फोटो शेअर केले आहेत. कोरोना काळातच मिहिका आणि राणाचं हैदराबादमध्ये धुमधडाक्यात लग्न झालं होतं. तेलुुगु आणि मारवाडी पद्धतीने त्यांनी लग्न केलं. त्यांच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मिहिकाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये दोघंही हनीमून मस्त एन्जॉय करताना दिसत आहेत. ते दोघंही एकमेकांसोबत खूश दिसत आहेत.

राणा दग्गुबती आणि मिहिका यांच्या लग्नामध्ये फक्त 30 वऱ्हाडी सहभागी झाले होेेते. राणा आणि मिहिकाच्या कुटुंबातले सदस्य आणि जवळचे मित्र यामध्ये होते. व्यंकटेश, सामंथा अक्केनेगी, राम चरण, अल्लू अर्जुन आणि नागा चैतन्य त्यांच्या लग्नाला हजर होते.

मिहिका आणि राणाचं लग्न कोरोना काळात झालं असल्यामुळे संपू्र्ण खबरदारी बाळगून त्यांचं लग्न पार पडलं. लग्नामध्ये सहभागी झालेल्या सर्व वऱ्हाडी मंडळींची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. लग्नाचा पूर्ण परिसर सॅनिटाईज करण्यात आला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या