JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'सुशांतप्रमाणे कार्तिकलाही फासावर लटकण्याची वेळ आणू नका..', करण जोहरवर कंगनाचा पुन्हा हल्लाबोल

'सुशांतप्रमाणे कार्तिकलाही फासावर लटकण्याची वेळ आणू नका..', करण जोहरवर कंगनाचा पुन्हा हल्लाबोल

अभिनेता कार्तिक आर्यनला (Kartik Aaryan) धर्मा प्रॉडक्शन्सच्या (Dharma Productions) ‘दोस्ताना-2’ मधून (Dostana 2 ) वगळण्यात आल्याची बातमी समोर आल्यानंतर अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) कार्तिकच्या बाजूने मैदानात उतरली आहे. तिने पुन्हा एकदा करण जोहरवर हल्लाबोल केला आहे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

bolमुंबई, 17 एप्रिल: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनला (Kartik Aaryan) धर्मा प्रॉडक्शन्सच्या (Dharma Productions) बहुचर्चित ‘दोस्ताना-2’ मधून (Dostana 2) वगळण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. यानंतर अभिनेत्री कंगना रणोत (Kangana Ranaut) कार्तिकच्या बाजूने मैदानात उतरली असून कंगनाने एकामागून एक ट्वीट करत पुन्हा एकदा करण जोहर (Karan Johar) आणि ‘नेपोटिझम गँग’ या मुद्द्यावरून बॉलिवूडमधील अनेकांवर निशाणा साधला आहे. कार्तिकला एकटे सोडा, सुशांतप्रमाणे त्याच्याही पाठीमागे लागू नका आणि त्याला फासावर लटकवण्यासाठी भाग पाडू नका, असे म्हणत कंगनाने जोरदार हल्लाबोल केला. कंगना रणौत सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर (Sushant Singh Rajput Death Case)  तिने करण जोहर इंडस्ट्रीबाहेरील लोकांना काम देत नाही आणि त्रास देतो, असे अनेक थेट आरोप केले होते. त्यामुळे आताही कार्तिक आर्यनला धर्मा प्रॉडक्शनमधून बाहेर काढल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर कंगनाने पुन्हा आक्रमक रुप घेत करण जोहरवर टीका केली.

‘कार्तिक स्वत:च्या हिमतीवर इथंपर्यंत पोहचला आहे आणि पुढेही तो अजून स्वत:च्या हिमतीवर काम करत राहील. पापा जो (करण जोहर) आणि त्यांची नेपोटिझम गँग यांना एवढेच सांगते की, त्याला तरी आता एकटे सोडा. सुशांतच्या जसे मागे लागला होतात, तसे त्याच्या मागे पडू नका आणि त्याला फासावर जाण्यास भाग पाडू नका. गिधाडांनो त्याला एकटे सोडा’, असे कंगनाने ट्वीटमध्ये म्हटले आहे.

संबंधित बातम्या

जाहिरात

तीने आणखी एक ट्वीट करत म्हटलं आहे की, ‘कार्तिकने या चिल्लरांना घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही. घाणेरडे लेख लिहून आणि घोषणा देवून केवळ मनोबल खच्चीकरण करण्याचे काम चाललं असून त्याबाबत मौन पाळायचं नाटक यांनी लावलंय. या लोकांनी यापूर्वी सुशांतसाठी तो अमली पदार्थांमध्ये कसा गुरफटला आहे आणि त्याच्या व्यसनाधीनतेची कथा रचली होती.’

जाहिरात

आणखी एक ट्वीट करत कंगना असं म्हणाली आहे की, ‘तुझ्या सोबत आम्ही नेहमी आहोत हे लक्षात ठेव. ज्यांनी तुला बनवलं नाही, ते तुला बरबादही करू शकत नाहीत, आज तुला फारच एकटेपणा जाणवत असेल, त्रास होत असेल. मात्र असे वाटून घेण्याची अजिबात गरज नाही. या नाटक कंपनीविषयी सर्वांना माहीत आहे. त्यामुळे आपल्या वृत्तीवर विश्वास ठेवा आणि शिस्तबद्ध राहा.’ तर धर्मा प्रॉडक्शनकडून याबाबत मौन बाळगण्यात आले असून आम्ही सध्या कोणतीही प्रतिक्रिया देणार नसल्याचे सांगण्यासाठी त्यांनी एक पोस्टही शेअर केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या