JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / अरे देवा! सोनू सूदला चित्रपटात मार खाताना पाहून भडकलेल्या चिमुकल्याने फोडला TV

अरे देवा! सोनू सूदला चित्रपटात मार खाताना पाहून भडकलेल्या चिमुकल्याने फोडला TV

घराघरात सोनूला ओळखलं जातं लहानांपासून ते थोरांपर्यंत त्याला सारेच ओळखतात. पण याच संधर्भात एका चिमुकल्याची एक करामत समोर आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 14 जुलै : अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) मागील वर्षभराहून अधिक काळ लोकांची मदत केल्यामुळे चर्चेत आहे. अनेकांना त्याने जगण्यासाठी मदत केली. मजुरांना घरी पोहोचवण्यापासून सुरू झालेला त्याचा प्रवास आता लोकांना औषध पुरवण्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. घराघरात त्याला ओळखलं जातं लहानांपासून ते थोरांपर्यंत त्याला सारेच ओळखतात. पण याच संधर्भात एका चिमुकल्याची एक करामत समोर आली आहे. एका लोकल न्यूज चॅनलने दिलेल्या वृत्तानुसार तेलंगानाच्या (Telangana) संगारेड्डी येथील न्यालकल गावात राहणाऱ्या 7 वर्षीय मुलाने त्याच्या  घरचा टीव्ही सोनू सूदच्या प्रेमाखातर फोडला आहे.

‘Drishyam’ धील सोज्वळ अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज; सोशल मीडियावर viral होतायंत Bikini Photos

दरम्यान घडलं असं की, तो 7 वर्षीय चिमुकला टीव्ही वर सोनू सूदचा ‘ढुकुडु’ हा चित्रपट पाहत होता तेव्हा अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) सोनूला चित्रपटात एक कानशिलात लगावतो पण हे पाहून त्या चिमुकल्याला भलताच राग येतो आणि तो टीव्ही फोडतो. अगदी टीव्हीचे तुकडे तुकडे करतो.

याचं कारण विचारलं असता त्याने सांगीतल की, “सोनूने लॉकडाऊन काळात अनेकांची मदत केली. त्यामुळे त्याला हा सीन पाहून रहावलं नाही.”  यावर अभिनेता सोनू सूद नेही प्रतिक्रिया दिली आहे. तर त्याने मजेशीर अंदाजात म्हटलं की, ‘टीव्ही फोडू नका. आता त्याचे वडील मला नवीन टीव्ही देण्याची विनंती करतील.’

‘MIMI’ साठी क्रितीने वाढवलं होतं 15 किलो वजन; चित्रपटाचा trailer ठरतोय hit

दरम्यान सोनू सूड फाउंडेशनच (Sonu Sood foundation) काम जोरदार सुरूच आहे. अजूनही तो लोकांची सर्वतोपरी मदत करत आहे. ट्विटर वर त्याची माहिती तो शेअर करत असतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या