JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / मामू टेंशन नहीं लेनें का ! 'मुन्नाभाई 3' च्या प्रदर्शनाबद्दल अर्शद वारसीचा मोठा खुलासा

मामू टेंशन नहीं लेनें का ! 'मुन्नाभाई 3' च्या प्रदर्शनाबद्दल अर्शद वारसीचा मोठा खुलासा

मुन्नभाई M.B.B.S (Munna Bhai M.B.B.S) आणि लगे रहो मुन्नाभाईनंतर (Lage Raho Munna Bhai) प्रेक्षकांना तिसऱ्या भागाची प्रतीक्षा आहे. मुन्नाभाई 3 बद्दल स्वत: सर्किट अर्थात अर्शद वारसीने (Arshad Warsi) काही धक्कादायक खुलासे केले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 डिसेंबर: भिडू टेंशन नही लेने का.. हा संवाद वाचून कोणाची आठवण येते? भाई लूकमधल्या, कपाळाला टिळा लावलेल्या संजय दत्तची. होय ना? मुन्नभाई M.B.B.S  (Munna Bhai M.B.B.S) आणि लगे रहो मुन्नाभाई (Lage Raho Munnabhai) मधील मुन्ना आणि सर्किटच्या जोडीने प्रेक्षकांना वेड लावलं होतं. त्यामुळे मुन्नाभाईचा तिसरा भाग कधी येणार याकडे संजय दत्त (Sanjay Dutt) आणि अर्शद वारसीच्या (Arshad Warsi) चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. मुन्नभाई M.B.B.S हा सिनेमा 2003 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर 3 वर्षांनी अर्थात 2006 मध्ये लगे रहो मुन्नाभाई प्रदर्शित झाला मग मुन्नाभाई 3 ला एवढा वेळ का लागत आहे असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. याबाबत अर्शद वारसीने बातचीत करताना सांगितलं की, ‘या सिनेमाच्या 3 स्क्रिप्ट तयार आहेत. पण सिनेमाचं शूटिंग कधी सुरू होणार याबाबत अद्याप कोणतीच माहिती नाही.’  दिग्दर्शक राजू हिरानी आणि निर्माते विदू विनोद चोप्रा याबद्दल काहीच बोलयला तयार नाहीत.

संबंधित बातम्या

फेब्रुवारी महिन्यात चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल चर्चा रंगल्या होत्या. पण त्यानंतर लॉकडाऊन सुरू झाला आणि संजय दत्तला कॅन्सर झाल्याचं उघडकीस आलं त्यामुळे सिनेमाबद्दल काहीच अपडेट्स आल्या नाहीत. हा सिनेमा होईल की नाही याबद्दलच काही शाश्वती नसल्याचं चक्क अर्शद वारसीने सांगितलं आहे. 2 चित्रपट चांगले चालल्यानंतर तिसऱ्या सिनेमाचं घोडं नक्की कुठे अडलंय? असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडला आहे. आता हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार की, अर्शदचं म्हणणं खरं होणार हे येणारा काळच ठरवेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या