JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / भर रस्त्यावर महिलेच्या डोक्यात झाडली गोळी, मुंबईतील थरकाप उडवणारी घटना

भर रस्त्यावर महिलेच्या डोक्यात झाडली गोळी, मुंबईतील थरकाप उडवणारी घटना

पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासात असून आरोपींची माहिती गोळा करत आहेत.

जाहिरात

(मानखुर्द परिसरातील घटना)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 29 एप्रिल : मुंबईजवळील मानखुर्दमध्ये गोळीबाराची घटना समोर आली आहे. एका महिलेवर अज्ञात हल्लेखोराने गोळीबार केला आहे. या गोळीबार महिला गंभीर जखमी झाली असून तातडीने राजवाडी रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईचा मानखुर्द परिसरात एका महिलेवर आज संध्याकाळी 6:35 वाजेच्या दरम्यान मानखुर्द परिसरात ही घटना घडली. गोळीबार झालेल्या महिलेचं नाव फरजाना इरफान शेख (वय 22) असं आहे. तर सोनू सिंग (वय 55) आणि त्याचा मुलगा अतीस सिंग (25) अशी आरोपींचं नाव आहे. या महिलेवर गोळीबार करून घटनास्थळावरून दोघेही फरार झाले आहे. (नवरा-बायकोचं भांडण आणि आयुष्यातून कायमचा उठला पोपट; नेमकं प्रकरण काय?) या बाप-बेट्यांनी महिलेवर गोळीबार करून घटनास्थळावरून पळ काढला. या महिलेच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली. बेशुद्ध अवस्थेत या महिलेला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालय उपचारासाठी नेण्यात आलं होतं. पण डॉक्टरांनी तपासून या महिलेला मृत घोषित केलं. गोळीबार करणाऱ्या आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. ( आलिशान कारमधून आले 2 चोर; सोनं-चांदी नव्हे तर पळवला पोपट कारण… ) पोलीस उपायुक्त परिमंडळ 06 आणि सर्व पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण अधिकारी आणि अंमलदार घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासात असून आरोपींची माहिती गोळा करत आहेत. या महिलेवर गोळीबार का आणि कशाला करण्यात आला, याचे  कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस अधिक तपास करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या