नवऱ्याच्या जीवाची किंमत 80 हजार, पत्नीच्या कृत्याने पोलीसही हैराण
उधमसिंहनगर, 28 मे: विवाहबाह्य संबंधात अडथळा ठरत असलेल्या पतीलाच संपवण्याचा डाव प्रियकराच्या मदतीनं पत्नीनं आखला. प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्यानं पतीच्या हत्येची सुपारी दिली. 23 मेला सुपारीचा पहिला हप्ता मिळाल्यावर दोघा कॉन्ट्रॅक्ट किलरनी पतीवर हल्ला केला. यामध्ये तो जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस तपासात पत्नीच हत्येची सूत्रधार असल्याचं पुढं आलं असून पत्नी, प्रियकरासह चौघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मौसमी लालवर गोळीबार उधमसिंहनगर जिल्ह्यातील किच्छा कोतवाली भागातील खुरपिया फार्म या गावातील रहिवासी असलेल्या मौसमी लाल यांच्यावर 23 मे रोजी रात्री 9.15 च्या सुमारास दोन अज्ञात तरुणांनी गोळीबार केला. अज्ञात तरुणांनी सुरू केलेल्या अंधाधूंद गोळीबारात मौसमी लाल गंभीर जखमी झाले. स्थानिक लोकांनी मौसमी लाल यांना सीएचसी किच्छा येथे दाखल केले. जखमीचा भाऊ ललितच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
पत्नी चंदा अडकली सापळ्यात या घटनेची माहिती देताना रुद्रपूरचे एसपी सिटी मनोज कात्याल यांनी सांगितलं की, इन्स्पेक्टर धीरेंद्र कुमार यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकानं तक्रार दाखल होताच तपासाची चक्रे फिरवली. जखमी मौसमी लालच्या पत्नी चंदाच्या कॉल डिटेल्सच्या आधारे या प्रकरणाचा तपास सुरू केला. चंदाची चौकशी सुरू केली असता तिने उडवाउडवीची उत्तरं द्यायला सुरुवात केली. पोलिसांची दिशाभूल करत असल्याचे लक्षात येताच तिची कसून चौकशी करण्यात आली. तेव्हा तिनं सांगतिलं की, तिचे गावातीलच एकाशी गेल्या सात वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते. यात पती मौसमी लाल याचा अडथळा होता. हा अडथळा बाजूला करायचा होता त्यामुळेच हत्येचा डाव आखला. एका घरातल्या 21 जणांचे एकाच मंडपात लग्न, या कारणामुळे केलं सामुहिक विवाहाचे आयोजन सुपारीची रक्कम मिळताच हल्ला चंदा आणि तिचा प्रियकर जितेंद्र कुमार यांनी मौसमी लालला मारण्याचा प्लॅन तयार केला. जितेंद्रने त्याचे दोन मित्र युवराज सिंग आणि अभय ठाकूर यांच्याशी बोलून 80,000 रुपयांची सुपारी दिली. बँकेतून पैसे काढून 80 हजार रुपये अभय आणि युवराजला दिले. सुपारीची रक्कम मिळाल्यानंतर 23 मे रोजी अभय आणि युवराजने जवळूनच मौसमी लालवर गोळीबार केला. मात्र अभयचा फायर चुकला, तर युवराजच्या गोळीबारात मौसमी लाल गंभीर जखमी होऊन गावाकडे पळू लागला. त्यानंतर दोघेही मोटारसायकलवरून फरार झाले. पोलिसांनी जखमीची पत्नी चंदा, चंदाचा प्रियकर जितेंद्र कुमार, शूटर अभय आणि युवराज, घटनेत वापरलेले 315 बोअरचे दोन पिस्तूल, दोन खोकी, 41 हजार रुपये रोख, एक एटीएम, मोटारसायकल आणि एक मोबाइल असा मुद्देमाल जप्त केला आहे.