वेल्लोर, 21 डिसेंबर: यूट्यूबवरचा व्हिडिओ (YouTube Video) पाहून दरोडा टाकणाऱ्या (Theft) आणि कोट्यवधी रुपये लंपास (Looted crores of ruppes) करणाऱ्या आरोपीचा शोध घेता घेता पोलिसांच्याही (Police) नाकी नऊ आले. पहिल्यांदा कुठलाही गुन्हा करणारा आरोपी हा अनेक चुका करत असतो. त्यामुळे अशा आरोपीला पकडणं आणि त्याच्या आरोपाचे पुरावे गोळा करणं पोलिसांना सहज शक्य होतं. मात्र नुकत्याच समोर आलेल्या दरोड्यातील आरोपीनं इतक्या सराईतपणे गुन्हा केला होता, की त्याला पकडणं हे पोलिसांसाठी एक मोठं आव्हान बनलं होतं. अशी केली चोरी तमिळनाडूच्या वेल्लोरमधील अलुक्कास ज्वेलर्समध्ये चोरी झाल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली होती. 15 डिसेंबर रोजी दागिन्यांच्या या दुकानातून तब्बल 15 किलो सोन्याचे दागिने चोरून नेण्यात आले होते. याच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका व्यक्ती वाघाचा मुखवटा घालून आल्याचं दिसत होतं. मात्र त्यापलिकडे कुठलाच पुरावा पोलिसांना मिळत नव्हता. पुराव्याचा शोध या व्यक्तीला दुकानात येतान किंवा दुकानातून बाहेर जाताना पाहिलेली एकही व्यक्ती पोलिसांना भेटत नव्हती. या गोष्टीचं पोलिसांना आश्चर्य वाटत होतं. साधारणतः गुन्हा घडल्यानंतर आरोपी निघून जाताना अनेकांनी त्यांना पाहिलेलं असतं. मात्र या घटनेत असा कुठलाच सुगावा पोलिसांना लागत नव्हता. आरोपीने यूट्यूबवरील व्हिडिओ पाहून हा दरोडा टाकल्याचं नंतर लक्षात आलं. असे लपवले पुरावे आरोपीनं दरोडा टाकण्यापूर्वी 10 दिवसांपासून ज्वेलरी शॉपची भिंत उकरायला सुरुवात केली होती. ज्या दिवशी त्याने शेवटचा घाव घातला, त्याच वेळी भिंतीतून थेट दुकानात प्रवेश केला. त्यामुळे आरोपी नेमका कुठून आला, कुठल्या दरवाजातून त्याने प्रवेश केला, हे सुरूवातीला पोलिसांना समजतच नव्हतं. दुकानात आल्या आल्या स्प्रे पेंटिंगचा वापर करून त्याने सीसीटीव्ही बंद करण्याचा प्रयत्न केला. हे तंत्रदेखील आणखी एक यूट्यूब व्हिडिओ पाहूनच तो शिकला होता. हे वाचा- पेट्रोल पंपावर गेलेली महिला; माथेफिरूने लावली कारला आग अन्.., धडकी भरवणारा VIDEO पोलिसांनी केली अटक पोलिसांनी या दुकानाव्यतिरिक्त इतरत्र 200 ठिकाणची सीसीटीव्ही फुटेज पाहिली आणि आरोपीला शोधलं. कुचिपलयम गावात राहणाऱ्या तीखाराम नावाच्या 22 वर्षांच्या तरुणानं ही चोरी केल्याचं उघड झालं आहे. त्याच्याकडून पोलिसांनी 10 कोटी रुपयांचं सोनं आणि हिरे जप्त केले.