जयपुर, 31 मे : राजस्थानातील (Rajasthan News) बूंदी या भागातून हैराण करणारी घटना समोर आली आहे. येथे एका पत्नीने आपल्या पतीला इतका त्रास दिला की, त्याने आत्महत्येचं (Husband Suicide) पाऊल उचललं. शेवटी त्याचा मृतदेह जयपूर रेल्वे ट्रॅकवर तुकड्यांमध्ये सापडला. मृतदेहाजवळ पोलिसांना एक सुसाइड नोट सापडली आहे. ही नोट वाचल्यानंतर पत्नीच्या अत्याचाराबाबत खुलासा झाला. या सर्व प्रकरणानंतर पतीच्या कुटुंबीयांनी त्याची पत्नी आणि कुटुंबातील सदस्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र ही बाब समोर आल्यानंतर पत्नी फरार असून तिचा कथितरित्या दुसरा पतीदेखील गायब आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? राजस्थानमधील बंदू शहरात राहणाऱ्या कांंशीराम यांनी सांगितलं की, त्यांचा भाऊ सीतारामचं लग्न 8 वर्षांपूर्वी गावात राहणाऱ्या सोना नावाच्या तरुणीसोबत झालं होतं. लग्नाच्या 3 वर्षांपर्यंत सर्व व्यवस्थित सुरू होतं. मात्र यानंतर अचानक सोना बेपत्ता झाली. यानंतर कुटुंबातील लोकांनी तिचा शोध सुरू केला. काही दिवसांनंतर कळालं की, सोनाने दुर्गा लाल गुर्जर नावाच्या एका व्यक्तीसोबत लग्न केलं असून ती त्याच्यासोबत राहत आहे. सीतारामला याबाबत कळाल्यानंतर त्याला धक्काच बसला. त्याने सोनाला पुन्हा घेऊन येण्याची सर्व अपेक्षा सोडली. यानंतर तो आपलं आयुष्य साधारणपणे जगत होता. यानंतर 4 वर्षांपर्यंत सर्व ठीक सुरू होतं. मात्र 2 महिन्यांपूर्वी सोना परतल आली. आणि पुन्हा पतीसोबत राहू लागली. याच्या तीन दिवसात सीतारामचा मृतदेह रेल्वेच्या ट्रॅकवर सापडला. सीतारामचा भाऊ काशीरामने पोलिसांनी सांगितलं की, सोना आणि सीताराम यांच्यामध्ये काही महिन्यांपासून पुन्हा बातचीत सुरू झाली होती. याबाबत कुटुंबातील कोणत्याही सदस्याला काहीच माहिती नव्हती. तब्बल दोन महिन्यांपूर्वी मृत तरुण सोनाला आपल्यासोबत घेऊन आला. बूंदीमध्ये दोघे एकत्र राहू लागले. मात्र यंदा सोना संपूर्ण कारस्थान करून आली होती. काही दिवसानंतर सोना गुर्जरने पती सीतारामला सांगितलं की, बंदू सोडून जयपूरला जाऊ. येथे चांगला काम मिळेल. सीताराम सोन्याच्या जाळ्यात अडकला आणि कुटुंबाचा विरोध करीत जयपूरमध्ये घर भाड्याने घेतलं. 2 महिन्यांपर्यंत सीताराम आणि सोना एकत्र पाहिले. मात्र 4 दिवसांपूर्वी सीताराम कामावर गेला असताना सोना घरातून 3 लाख रुपयांचे दागिने आणि 2 लाखांची कॅश घेऊन दुसऱ्या पतीकडे निघून गेली. याबाबत सीतारामला कळताच त्याला धक्काच बसला. 3 दिवसांपूर्वी त्याचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर सापडला.