Home /News /crime /

लज्जास्पद! चार दिवसांपासून आईचा मृतदेह अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत; मुलगा म्हणतो, माझा संबंध नाही!

लज्जास्पद! चार दिवसांपासून आईचा मृतदेह अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत; मुलगा म्हणतो, माझा संबंध नाही!

काही दिवसांपूर्वीच आपण मदर्स डे मोठ्या आनंदात साजरा केला. त्याच्या काही दिवसात अत्यंत हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. मुलगा, मुलगी, नातेवाईक असतानाही अशी परिस्थिती आली आहे.

    भोपाळ, 29 मे : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh News) खंडवामध्ये एका मुलाने आपल्या आईचा मृतदेह घेण्यास नकार दिला. इतकच नाही तर कुटुंबीयांसाठीही मृत महिलेवर अंत्यसंस्कार करण्यासाठी वेळ नव्हता. खंडवाच्या जिल्हा रुग्णालयाच्या शवगृहात गेल्या 4 दिवसांपासून महिलेचा मृतदेह पडून आहे. मात्र अंत्यसंस्कारासाठी कुटुंबातील कोणीच आलेलं नाही. मुलाने तर आईसोबत काहीच संबंध नसल्याचं सांगून पाठ फिरवली. गेल्या चार दिवसांपासून पोलीस महिलेच्या नातेवाईकांशी संपर्क करीत आहेत. मात्र महिलेचा कोणताही नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी पुढे येत नाही. काय आहे संपूर्ण प्रकरण... यवतमाळ जिल्ह्याच्या वणी गावात राहणारी 55 वर्षीय पुष्पा सिंह यांचा एका अपघातात मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, 25 मे रोजी पुष्पा आपली मुलगी निकिता (27), भाचा अभिषेक (27) आणि भाची पिंकी (29) यांच्यासोबत कारने बैतूलच्या देसली मार्गातून ओंकारेश्वरच्या दिशेने जात होते. महिलेचा भाचा अभिषेक कार चालवित होता. देसली गावाजवळ स्टेअरिंग फेल झाल्यामुळे कार पलटली. या अपघातात पुष्पा, निकिता आणि पिंकी या गंभीर जखमी झाल्या. अभिषेकने स्थानिकांच्या मदतीने तिघींना खंडवा जिल्हा रुग्णालयात पोहोचवलं. येथे पुष्पाला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. यानंतर निकीता आणि पिंकीला रुग्णालयात रेफर करण्यात आलं. पोस्टमार्टम न करता अभिषेकने पुष्पाचा मृतदेह येथेच सोडून निघून गेला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुष्पाच्या सासरच्या पक्षापासून मुलगा, भाऊ, यांना फोन केला. मात्र ते मृतदेह घेण्यासाठी आले नाहीत. काहींनी दिलेल्या माहितीनुसार, संपत्तीच्या वादामुळे मुलाने आईपासून संबंध तोडले होते. यानंतर आई मुलींजवळ राहत होती. शेवटी पुष्पाचा भाऊ म्हणाला की, मी अंत्यसंस्कारासाठी येईन, मात्र रिजव्हेशन न मिळाल्याने यायला उशीर होईल. पतीच्या मृत्यूनंतर तिनेच मुलांना मोठं केलं होतं. मुलं मोठी झाल्यानंतर ते आईची जबाबदारी घेण्यास नकार देत होते. मृत्यूनंतरही तिला मुलांचा खांदा मिळाला नाही. निर्लज्ज मुलगा म्हणाला, माझा आईशी काहीही संबंध नाही... पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी मृत महिलेच्या मुलाला फोन केला तर त्याने येणार नसल्याचं सांगितलं. माझा आईशी काहीही संबंध नाही. पुष्पाच्या सासऱ्यांशी संपर्क केला तर त्यांनी खूप वय झाल्याचं सांगितलं. पुष्पाला चार दीर आणि त्यांची मुलंही आहेत. मात्र कामात व्यस्त असल्याचं सांगून कोणीही महिलेच्या अंत्यसंस्कारासाठी आलं नाही.  

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Accident, Madhya pradesh, Mother

    पुढील बातम्या