JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / कोपरखैरणेमधील 'त्या' मृतदेहाचं गूढ अखेर उलगडलं; सुरक्षारक्षकानेच महिलेला संपवलं

कोपरखैरणेमधील 'त्या' मृतदेहाचं गूढ अखेर उलगडलं; सुरक्षारक्षकानेच महिलेला संपवलं

दोन दिवसांपूर्वी कोपरखैरणे परिसरात एका अनोळखी महिलेचा मृतदेह पोलिसांना आढळला होता. या महिलेच्या मृतदेहाचं गूढ उकलण्यात पोलिसांना अखेर यश आलं आहे.

जाहिरात

सुरक्षारक्षकाने केली महिलेची हत्या

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी मुंबई, 16 फेब्रुवारी, प्रमोद पाटील : दोन दिवसांपूर्वी कोपरखैरणे परिसरात एका अनोळखी महिलेचा मृतदेह पोलिसांना आढळला होता. या महिलेच्या मृतदेहाचं गूढ उकलण्यात पोलिसांना अखेर यश आलं आहे. लग्नाचा तगादा लावला म्हणून सुरक्षारक्षकानेच या महिलेची हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. मृत महिलेची ओळख पटवल्यानंतर अवघ्या 48 तासांमध्ये पोलिसांनी आरोपीला अटक केलं. त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पतीने ओळख पटवली   घटनेबाबत अधिक माहिती अशी की, दोन दिवसांपूर्वी एका अनोळखी महिलेचा मृतदेह कोपरखैरणे हद्दीत पोलिसांना मिळाला होता. ही महिला नेमकी कोण आहे? आणि तिचा मृत्यू कसा झाला याबाबत कोपर खैरणे पोलीस आणि गुन्हे अन्वेषण विभागाने संयुक्तिक तपास सुरू केला होता. तांत्रिक बाबी तपासल्या असत्या ट्रॉम्बे, मुंबई येथील एक महिला बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मृत महिलेचा फोटो पाहून तिच्या पतीने तिची ओळख पटवली.

आरोपीला अटक   ही महिला नवी मुंबईतील जुईनगरमध्ये एका इमारतीत घरकाम करत होती. त्याच इमारतीमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीसोबत तिचे प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर या महिलेनं त्याच्याकडे लग्नाचा तगादा लावला. महिलेनं लग्नाचा तगादा लावल्याच्या रागातून त्याने तिची हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या