'तिचा' मृतदेह फ्रिजमध्ये अन् प्रियकर बोहल्यावर 

दिल्लीमध्ये पुन्हा एकदा श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती झाली आहे. पोलिसांना फ्रिजमध्ये एका तरुणीचा मृतदेह आढळला आहे.

निक्की यादव असं या तरुणीचं नाव आहे, तिचा प्रियकर असलेल्या साहिल गहलोत यानेच तिची हत्या केली.

निक्कीच्या हत्यानंतर त्याने तिचा मृतदेह त्याच्या मालकीच्या ढाब्यातील फ्रिजमध्ये ठेवला 

 2018 साली उत्तम नगरमधल्या करियर पॉईंट कोचिंग सेंटरमध्ये दोघांची मैत्री झाली होती, नंतर मैत्रीचं रुपातंर प्रेमात झालं

गेल्या अनेक दिवसांपासून निक्की आणि साहिल एकत्रच राहत होते.

परंतु याचदरम्यान साहिलचं दुसऱ्या एका तरुणीसोबत लग्न जमलं.

याची माहिती निक्कीला होताच तीचा साहिलसोबत वाद झाला.

साहिल याने या वादातून निक्कीची हत्या केली नंतर तिचा मृतदेह फ्रिजमध्ये ठेवून दुसरे लग्न देखील केले.

अखेर पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दाफाश केल्यानंतर धक्कादायक घटना समोर आली आहे.