JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / VIDEO : पुण्यात हत्येचा भयानक थरार, तरुणावर तब्बल 35 वार, खतरनाक घटना सीसीटीव्हीत कैद

VIDEO : पुण्यात हत्येचा भयानक थरार, तरुणावर तब्बल 35 वार, खतरनाक घटना सीसीटीव्हीत कैद

पुण्यात हत्येचा भयानक थरार समोर आला आहे. आरोपींनी तरुणावर तब्बल 35 वार केले. या घटनेचा थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 27 जुलै : पुण्यात मध्यरात्री एकच्या सुमारास एका तरुणाची भीषण हत्या करण्यात आली होती. संबंधित हत्या ही सोमवारी रात्री एक वाजेच्या सुमारास घडली. या हत्येचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अतिशय भयानक संबंधित घटना आहे. पुण्याच्या नाना पेठ परिसरात संबंधित घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे सर्वसामान्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पण पोलिसांनी या प्रकरणी संवेदनशीलपणे परिस्थिती हाताळत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. नेमकं प्रकरण काय? पुण्यातील नाना पेठेत पूर्व वैमनस्यातून तरुणाचा खून करणाऱ्या तरुणांना पोलिसांकडून अटक करण्यात आलीय. नाना पेठेतील नवा वाडा या ठिकाणी पूर्ववैमनस्यातून अक्षय वल्लाळ या तरुणाचा चाकू भोकसून खून करण्यात आला होता. महेश नारायण बुरा, किशोर अशोक शिंदे (दोघेही रा. नवा वाडा, नाना पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ( छापखान्यातील नकली नोटा थेट मुंबईला रवाना; घटनास्थळाहून तब्बल 3 कोटी जप्त, खेड्यात सुरू होतं क्राइम ) याप्रकरणी अतुल गंगाधर गायकवाड (वय 33, रा. नाना वाडा, नाना पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अक्षय ज्या भागात राहत होता त्या भागात अक्षयचं वर्चस्व होतं आणि हेच या दोघांच्या डोळ्यात खूपत होतं. हाच राग मनात धरून त्या दोघांनी अक्षयचा काटा काढायचा ठरवलं. अक्षयचे काही दिवसांपूर्वी दोघांसोबत याच गोष्टीवरून वाद विवाद झाले होते. याचाच राग मनात धरून त्या दोघांनी सोमवारी मध्यरात्री नवा वाडा परिसरातील एका इस्त्रीच्या दुकानाजवळ अक्षयवर चाकूने वार केले. तसेच त्याच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घातला. अक्षयवर त्या दोघांनी तब्बल 35 वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अक्षयचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी दोन्ही आरोपींवर समर्थ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींनी हत्या का केली? मयत अक्षय हा नाना पेठेत राहत होता. तर आरोपी देखील त्याच परिसरात राहतात. दोघेही सराईत गुन्हेगार. ज्या परिसरात राहायचे त्या ठिकाणी दादागिरी करायचे. तर अक्षयची समाजात चांगला माणूस म्हणून ओळख होती. लोकांच्या अडीअडचणीला तो धावून जात होता. चांगल्या लोकात त्याची उठबस होती. नेमके हेच आरोपीला पाहवत नव्हते. त्याची समाजातील चांगली ओळख आरोपीच्या डोळ्यात सलत होती. याच गोष्टीवरून दोघेही त्याच्यावर चिडून असायचे. सोमवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास अक्षय दोन मित्रांसोबत बोलत थांबला होता. त्याचवेळी आरोपींनी बेसावध अक्षयवर प्राणघातक हल्ला केला. तीक्ष्ण हत्याराने त्याच्यावर वार केले. तो निपचित पडल्यानंतर सिमेंटचा गट्टू घेऊन पुन्हा त्याच्या डोक्यात वार केले. आरोपींनी काही सेकंदात तब्बल 35 वार केले. रक्तबंबाळ झालेल्या अक्षयचा जागेवरच मृत्यू झाला. दरम्यान अक्षय बदलाच्या हत्येनंतर नाना पेठ परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पण पोलिसांनी संवेदनशीलपणे परिस्थिती हाताळत अवघ्या काही तासात आरोपींना अटक केल्याने तणाव निवळलाय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या