जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / छापखान्यातील नकली नोटा थेट मुंबईला रवाना; घटनास्थळाहून तब्बल 3 कोटी जप्त, खेड्यात सुरू होतं क्राइम

छापखान्यातील नकली नोटा थेट मुंबईला रवाना; घटनास्थळाहून तब्बल 3 कोटी जप्त, खेड्यात सुरू होतं क्राइम

छापखान्यातील नकली नोटा थेट मुंबईला रवाना; घटनास्थळाहून तब्बल 3 कोटी जप्त, खेड्यात सुरू होतं क्राइम

पोलीस ठाण्यापासून अवघ्या 2 किमी दूर एका खोलीत गेल्या वर्षभरापासून नकली नोटा छापल्या जात होत्या.

  • -MIN READ
  • Last Updated :

बिकानेर, 26 जुलै : राजस्थानमध्ये पैशांची हेराफेरी आणि नकली नोटांसंबंधित मोठा खुलासा झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिकानेरमधील लणूकरनसर पोलीस ठाण्यापासून अवघ्या 2 किमी दूर एका खोलीत गेल्या वर्षभरापासून नकली नोटा छापल्या जात होत्या. मात्र पोलिसांना याबाबत काहीच माहिती नव्हती. यादरम्यान ग्राम पंचायतीच्या बैठकीत या भागात नकली नोटा छापण्याची चर्चा झाली. यानंतर दोन शिपायांना याबाबत माहिती झाली. त्यांनी उच्च अधिकाऱ्यांना याबाबत तातडीने कळवलं. पोलिसांनी या प्रकरणात 6 जणांना अटक केली आहे. राजस्थानच्या अनेक शहरांमध्ये नकली नोटा व्यवहारी… पोलिसांनी शनिवारी सायंकाळी साधारण साडे सात वाजता छापेमारी करीत घटनास्थळाहून 2 कोटी 74 लाखांचे नकली नोटा जप्त केल्या. सोबतच 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येथून कोट्यवधी रुपयांच्या नकली नोटा दिल्ली, कलकत्ता, मुंबई, सुरत, अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरूसह देशभरातील अनेक शहरांमध्ये वाटले जात होते. हरयाणा पोलिसांना दिली सूचना… दीपक रॅगर नावाच्या व्यक्तीच्या माध्यमातून नकली नोटा व्यवहारात आणल्या जात होत्या. चंपालाल शर्माच्या गँगचा एक सदस्य दिल्लीत नोट सप्लाय करण्यासाठी हॉटेलमध्ये थांबला होता. कारवाईबद्दल कळताच तो तेथून फरार झाला. यानंतर बिकानेर आयडीने हरयाणाच्या करनाल आयजीला याबाबत सूचना दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात