JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / साहिलच्या लग्नाचा फोटो समोर, घटनेनंतर फोनचा डेटा डिलीट, निक्कीच्या हत्येची Inside Story

साहिलच्या लग्नाचा फोटो समोर, घटनेनंतर फोनचा डेटा डिलीट, निक्कीच्या हत्येची Inside Story

Delhi Uttam Nagar Nikki Yadav Murder Case: दिल्लीतील निक्की यादव मृत्यू प्रकरणातील आरोपी साहिल गेहलोत याने धक्कादायक खुलासा केला आहे.

जाहिरात

निक्की यादव मृत्यू प्रकरणातील आरोपीचा खुलासा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी : व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी दिल्लीत श्रद्धा वालकर घटनेची पुनरावृत्ती झाल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. हरियाणातील झज्जर येथे राहणारी 22 वर्षीय निक्की यादव हिची दिल्लीत तिचा प्रियकर साहिल गेहलोत याने हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह ढाब्याच्या डीप फ्रीजमध्ये लपवून ठेवला. आता गुन्हे शाखेच्या ताब्यात आलेल्या आरोपीने हत्येबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. आरोपी साहिलने 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 8.30 ते 9.30 च्या दरम्यान निक्की यादवची हत्या केल्याचे सांगितले. तो म्हणतो की 9 फेब्रुवारीच्या रात्री निक्की त्याच्यासोबत होती. दोघेही अनेक तास दिल्लीत फिरत राहिले. या प्रकरणाची माहिती देताना डीसीपी सतीश कुमार आणि एसीपी राजकुमार यांनी सांगितले की, 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 8.30 ते 9.30 दरम्यान आरोपी साहिलने निगम बोध घाटाजवळील पार्किंगमध्ये निक्की यादवची हत्या केली होती. आता गुन्हे शाखेचे पथक आरोपीने ज्या पार्किंगचे लोकेशन दिले आहे त्या पार्किंगचे सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. वाचा - स्वत:च्या दोन मुलांची निर्दयी आईकडूनच हत्या, धक्कादायक कारण समोर आरोपी साहिलने निक्कीचा फोन डेटा केला डिलीट पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी साहिलकडून निक्की यादवचा फोनही जप्त करण्यात आला आहे. आरोपीने निक्कीच्या फोनचा सर्व डेटा डिलीट केला होता. या तपासात आपले आणि निक्कीचे व्हॉट्सअॅप चॅट खूप महत्त्वाचे ठरू शकतात हे आरोपीला माहीत होते, त्यामुळे त्याने हा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. व्हॉट्सअॅप चॅटवरून दोघांमध्ये अनेकदा भांडण झाल्याचं सांगण्यात येत आहे. फोनमध्ये दोघांचे अनेक फोटोही होते.

त्याच्या आणि निक्की यादवच्या चॅटचा पोलिसांसाठी मोठा पुरावा ठरू शकतो हे आरोपीला माहीत होते, त्यामुळे त्याने त्याच्या आणि निक्की यादवच्या फोनमधील सर्व डेटा डिलीट केला. निक्कीच्या हत्येनंतर आरोपीने तिचा फोन बंद करून तो आपल्याजवळ ठेवला होता. आधी फोनचे सिम काढले. नंतर डिव्हाइसमधून सर्व डेटा काढून टाकून तो बंद केला. आता क्राइम ब्रांचची टीम उत्तम नगर ते निजामुद्दीन आणि कश्मीरे गेट या मार्गाचे अनेक सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करत आहे, जेणेकरून आरोपीच्या जबाबाचे सत्य समोर येईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या