औरंगाबाद, 15 फेब्रुवारी : आईनंच पोटच्या मुलांचा गळा घोटून त्यांची हत्या केल्याची घटना औरंगाबादच्या सादातनगर परिसरात 6 फेब्रुवारीला उघडकीस आली होती. तर अल्पवयीन मुलांचा आईनं झोपेतच जीव घेतल्याचे समोर आल्याने शहरात खळबळ उडाली होती. मात्र आईने आपल्याच पोटच्या लेकरांचा जीव का घेतला याचे कारण समजू शकले नव्हते.
दरम्यान पोलीस कोठडीत असलेल्या आरोपी महिलेने अखेर हत्या केल्याचं कबूल करत, “मला मुलं सांभाळणं असह्य झालं होतं. त्यामुळे चिडचिड व्हायची, म्हणून दोन्ही मुलांचा जीव घेतल्याच महिलेने सांगितले आहे. याप्रकरणी औरंगाबादमधील सातारा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
हे ही वाचा : प्रेम, लिव्ह-इन अन् धोका, हत्येच्या दिवशीच प्रियकराचं लग्न, लव्ह स्टोरीचा धक्कादायक शेवट!
एका आईने आपल्या दोन चिमुकल्या मुलांचा झोपेत गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही महिला मनोरुग्ण असल्याचे समजत असून तिला अटक करण्यात आली आहे. अदीबा फहाद बसरावी (वय 8), अली बिन फहाद बसरावी (वय 4) असे खून झालेल्या दोन भावंडांची नावे आहेत. औरंगाबाद शहरातील सादात नगर परिसरात ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार दोन अल्पवयीन सख्या बहिणभावाचा राहत्या घरात संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मुलगी अदीबा आणि मुलगा अली रविवारी रात्री कुटुंबीयांसोबत जेवले आणि त्यानंतर आपल्या खोलीत जाऊन झोपले. दुसऱ्या दिवशी दुपारचे बारा वाजले तरी दोघे खोलीतून बाहेरच आले नाहीत. त्यावेळी त्यांची आई त्यांना उठवण्यासाठी गेली.
मात्र, दोघेही बेशुद्ध असल्याचे आढळल्याने त्यांना तात्काळ येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मुलांचा मत्यू नेमका झाला कसा? याचा शोध घेण्यासाठी तपास पथक स्थापन केले.
हे ही वाचा : मारहाणीचा अपमान सहन नाही झाला, तरुणाचे उचलले टोकाचे पाऊल
तपासात धक्कादायक माहिती पुढे आली. दोन्ही मुलांच्या जन्मदात्या आईनंच रात्री मुलांची गळा दाबून हत्या केल्याचं स्पष्ट झाले आहे. दरम्यान तिला सांभाळणे कठीण होत असल्याने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी आरोपी आईला अटक केली आली असून पुढील तपास औरंगाबाद पोलिस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad, Aurangabad News, Crime news, Murder news