JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / खळबळजनक! सुहागरातला खोलीत गेलं नवविवाहित जोडपं; दुसऱ्या दिवशी सकाळी बेडवर दोघांचेही मृतदेह

खळबळजनक! सुहागरातला खोलीत गेलं नवविवाहित जोडपं; दुसऱ्या दिवशी सकाळी बेडवर दोघांचेही मृतदेह

सुहागरातलाच नवरा-नवरी दोघांचाही मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली.

जाहिरात

प्रतीकात्मक फोटो - Canva

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लखनऊ, 01 जून : नवरा-नवरीचं थाटात लग्न झालं. वरात पुन्हा नवरदेवाच्या घरी आली. नवरीबाईला वाजतागाजत सासरी आणण्यात आलं. सर्व जण आनंदात होते. घरात लग्नाचा उत्साह होता. घरी आल्यावर सर्व विधी पार पडल्यावर सर्वांचं जेवण वगैरे झालं. यानंतर नवविवाहित दाम्पत्याला सुहागरातसाठी एका खोलीत पाठवण्यात आलं. पण ते पुन्हा जिवंत परतलेच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी खोलीतून त्यांचे मृतदेहच बाहेर पडले. उत्तर प्रदेशच्या बहराइचमधील ही खळबळजनक घटना आहे. गौ़डहिया नंबर 4 गावातील हे प्रकरण. इथं राहणारा 22 वर्षांचा प्रतापचं लग्न गौ़डहिया नंबर 3मधील 20 वर्षांच्या पुष्पासह झालं. 30 मे रोजी त्यांचा लग्नसोहळा पार पडला. पुष्पाला वाजतगाजत प्रतापच्या घरी आणण्यात आलं. सुनेचं आगमन होताच सर्व जण आनंदात होते. जेवून खाऊन हे दाम्पत्य सुहागरातसाठी आपल्या खोलीत गेलं.

सकाळ झाल्यावर त्यांचा दरवाजा ठोठावण्यात आला पण कुणीच दरवाजा उघडत नव्हतं. आवाज दिल्यावर आतून काही प्रतिसाहही मिळत नव्हता. शेवटी प्रतापचा लहान भाऊ श्यामू खिडकीतून त्यांच्या खोलीत घुसला. त्यानंतर त्याने जे पाहिलं ते पाहून त्याला धक्काच बसला. फक्त एका कापडासाठी! पाहुण्यांनी भरमंडपात नवरदेवासमोरच नवरीला…; Shocking Video प्रताप आणि पुष्पा बेडवर मृत पडले होते. त्याने दरवाजा उघडला. सर्वजण आत आले आणि दृश्य पाहून हादरलेच. संशयास्पद अवस्थेत दोघांचेही मृतदेह आढळले. …तर नवरीबाई पाहुण्यांना कोर्टात खेचणार; लग्नाची विचित्र अट सोशल मीडियावर चर्चेत दरम्यान पोलिसांनी दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवले आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.  आज तक च्या वृत्तानसुसार जिल्ह्याचे एसपी प्रशांत वर्मा यांनी सांगितलं की, दोघांचं लग्न घरच्यांच्या मर्जीने झालं होतं. कोणत्याही दबावात लग्न झालं नसल्याचं दोन्ही कुटुंबांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या