नवी दिल्ली, 20 मे : सामान्यपणे आपल्याकडे लग्न पत्रिकेत फार फार तर लग्नात येताना कृपया भांड्यांचा आहेर आणू नये असं लिहिल्याचं तुम्ही पाहिलं असेल. पण लग्नाची अशी काही प्रकरणं ज्यात चक्क पाहुण्यांसाठी अशा अटी घातल्या गेल्यात ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. एक नवरीबाई तर याच्याही पलिकडे गेली आहे. तिने तर लग्नाआधीच पाहुण्यांसाठी अशी अट घातली की सर्वांनाच धक्का बसला आहे. एका नवरीची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिने पाहुण्यांना चक्क कोर्टात खेचण्याचीच धमकी दिली आहे. तिची लग्नाची तयारी सुरू आहे. त्याआधी तिने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ज्यात तिने लग्नात बोलावल्या जाणाऱ्या पाहुण्यांना ठणकावलं आहे. जर त्यांनी ती गोष्ट केल नाही तर तिने आपण त्यांना कोर्टात खेचणार असल्याचं म्हटलं आहे. तिने फेसबुकवर ही पोस्ट केली आहे.
तिने फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे, “माझं माझ्या कुटुंबावर खूप प्रेम आहे, पण त्यांच्यावर विश्वास नाही. ऑक्टोबर 2024 मध्ये मी लग्न करणा आहे. यासाठी सर्वांना आमंत्रण देणार. पण त्यात स्पष्टपणे नमूद करणार की लग्नात येणार असल्याचं सांगूनही तुम्ही आला नाहीत तर तुमच्यामुळे वाया गेलेल्या जेवणाच्या पैशांसाठी मी तुम्हाला कोर्टात खेचणार. हे विचित्र वाटेल. पण तुम्ही सांगितल्यानुसार जर लग्नात आलात तर तुम्हाला पैसे देण्याची गरज नाही” उतावळी नवरी अन्…! लग्नाची इतकी घाई की अर्धवट कपड्यांतच मंडपात पोहोचली नवरीबाई; VIDEO VIRAL या नवरीबाईची लग्नासाठी विचित्र अटीची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. काही युझर्सना तिची ही आयडिया आवडली आहे. तर काहींनी मात्र तिच्या या विचित्र अटीला विरोध केला आहे. अशा वाईट पद्धतीने कोण आमंत्रण देतं, असं कुणी तुझ्या लग्नात येणारच नाही, अशी कमेंट काही युझर्सनी केली आहे. तर काहींनी लग्नात पाहुणे न आल्याने तिचे पैसे वाया जातील पण त्यासाठी पाहुण्यांना कोर्टात खेचणं योग्य नाही, असंही म्हटलं आहे. Viral Video : अचानक वधू स्टेजवर करायला लागली विचित्र कृत्य, वरासह सर्वच घाबरले दरम्यान तुम्हाला नवरीबाईची लग्नासाठी ही विचित्र अट कशी वाटली, ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.