नवी दिल्ली, 27 मे : लग्नाचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या अशाच एका व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओ पाहून सर्वांना धक्काच बसला आहे. कारण या लग्ना त फक्त एका कापडासाठी भरमंडपात भांडण झालं. ज्यात नवरी भरडली गेली. नवरीसोबत धक्कादायक घडलं आहे. प्रत्येक ठिकाणी लग्नाच्या वेगवेगळ्या प्रथा, परंपरा असतात. अशाच एका लग्नातील ही प्रथा. ज्यात एका कापडासाठी भरमंडपात भांडण होतं. वधू आणि वर आपसात भिडतात. कापडासाठी चढाओढ सुरू होते. पण इथं मात्र या चढाओढीत नवरीबाई चिरडली. नवरदेवासमोरच नवरीला पाहुण्यांनी फरफटत नेलं.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता नवरा-नवरी समोरासमोर बसले आहेत. काही विधी सुरू आहेत. इतक्यात एक परंपरा सुरू होते. ज्यात वर पक्ष आणि वधू पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकतात. दोन्ही बाजूकडील लोकांच्या मध्ये एक कापड असतं. हे कापड खेचण्याची स्पर्धा त्यांच्यात लागतं. …तर नवरीबाई पाहुण्यांना कोर्टात खेचणार; लग्नाची विचित्र अट सोशल मीडियावर चर्चेत दोन्ही पक्ष आपापल्या बाजूने जोर लावतात. इतक्यात एकाचा तोल जातो आणि तो धाडकन खाली कोसळतो तो नवरीच्या मांडीवरच बसतो. यानंतर आणखी काही लोक नवरीवर कोसळतात. या पाहुण्यांमध्ये नवरी चिरडते. धडाधड सर्वजण नवरीवर कोसळल्याने नवरी जमिनीवर आडवीच होते. त्यानंतर काही अंतर ती फरफटत गेल्याचंही दिसतं. भले तिला मुद्दामहून चिरडलं किंवा फरफटत नेलेलं नाही. तसा हा व्हिडीओ धक्कादायक आहे. पण एकंदर व्हिडीओ पाहिल्यावर सर्वजण यात हसताना दिसत आहे. म्हणजे लग्नाची एक परंपरा आहेत, ज्यात चुकून सर्वजण नवरीवर पडले आणि नवरीसोबत असं काहीतरी घडलं. सुरुवातीला तुम्हालाही हा व्हिडीओ गंभीर वाटेल पण नीट पाहिलं तर तुम्हाला हसू येईल. उतावळी नवरी अन्…! लग्नाची इतकी घाई की अर्धवट कपड्यांतच मंडपात पोहोचली नवरीबाई; VIDEO VIRAL @kemcho_gujrati इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला, याची प्रतिक्रिया आम्हाला द्या. तसंच तुम्हाला लग्नातील अशा विचित्र परंपरा, प्रथा, खेळाबाबत काही माहिती असेल तुमचा असा काही अनुभव, किसा असेल तर आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.