JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / राष्ट्रवादीचे आमदार सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात! अश्लील व्हिडीओ बनवून मागितली खंडणी

राष्ट्रवादीचे आमदार सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात! अश्लील व्हिडीओ बनवून मागितली खंडणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळचे आमदार यशवंत माने सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकल्याची घटना घडली आहे.

जाहिरात

राष्ट्रवादीचे आमदार सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात!

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी पुणे, 10 फेब्रुवारी : काही महिन्यांपूर्वी सेक्सटॉर्शनच्या घटनेने पुणे हादरलं होतं. या त्रासाला कंटाळून दोन तरुणांनी आत्महत्या केल्याने या घटनेचा खुलासा झाला. यानंतर वर्ध्यातील एका डॉक्टरकडूनही सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात ओढून लाखोंची खंडणी उकळली गेली. चंद्रपुरातही काही तरुणांनावर आत्महत्येचा विचार करण्याची वेळ आली. मात्र, आता या गुन्हेगारांनी आपला मोर्चा आता लोकप्रतिनिधींकडे वळवल्याचं दिसत आहे. सोलापूर मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यशवंत माने सेक्सटोर्शनचे बळी ठरले आहेत. काय आहे प्रकार? सोलापूर मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यशवंत माने यांचा मोबाईल क्रमांक सोशल मीडियावर मिळवून त्यांच्याशी व्हाट्सअपवर संपर्क साधण्यात आला. वेळोवेळी अश्लील संदेश पाठवले तसेच अश्लील व्हीडीओ कॉल करून त्यांना भुरळ पाडण्याचा  प्रयत्न केला. कॉल रेकॉर्ड करून यांचे फेसबुकवर असलेले मित्र यांना पाठविण्याच्या धमकी देऊन 1 लाख रुपये इतक्या रकमेच्या खंडणीची मागणी आरोपींनी केली. तसेच अश्लील व्हीडीओ कॉल सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

वाचा - लेकाचं लग्न बाबाच्या जीवावर बेतलं! तो विषयच नको म्हणून मुलाने वडिलांनाच संपवलं आरोपींच्या राजस्थानमधून आवळल्या मुसक्या या गुन्ह्यातील आरोपीने वापरलेल्या मोबाइलवरून आरोपी भरतपूर राज्यस्थान येथील असल्याचं निष्पन्न झालं आहे. पोलिसांनी शोध घेत आरोपी रिझवान अस्लम खान याला ताब्यात घेतलं आहे. आरोपीकडून 4 मोबाईल संच व 4 सिमकार्ड जप्त करण्यात आले आहेत. आरोपीच्या मोबाईल संचामध्ये स्क्रिन रेकॉर्ड केलेल्या 90 अश्लील व्हिडीओ क्लिप्स मिळाल्या आहेत. आरोपीला न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

काय आहे सेक्स्टॉर्शनचं जाळं? तरुण आणि धनाढ्य व्यक्तींना गाठून फेसबुकवर रिक्वेस्ट पाठवली जाते. या टोळीतल्या तरुणींना अश्लील बोलायला तयार केलेलं असतं. वेगवेगळ्या नंबरवरुन हा व्हिडिओ कॉल केला जातो. ओळख होताच तरुणी नग्न होऊन व्हिडिओ कॉल करते. समोरच्या व्यक्तीलाही कपडे काढायला लावले जातात. ज्याला जाळ्यात ओढायचं त्याला बोलायला भाग पाडून रेकॉर्डिंग केलं जात आणि त्यानंतर खंडणी मागण्यास सुरुवात होते. खंडणीची रक्कम बनावट खात्यात मागवली जाते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या