JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / दारू कंपनीचा मॅनेजर बॅग भरून घेऊन आला पैसे, भर रस्त्यात गोळ्या झाडून 22 लाख घेऊन पळाले

दारू कंपनीचा मॅनेजर बॅग भरून घेऊन आला पैसे, भर रस्त्यात गोळ्या झाडून 22 लाख घेऊन पळाले

संजय सिंह हे आपल्या कारने आपल्याजवळील रक्कम सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये भरण्यासाठी जात होते

जाहिरात

संजय सिंह हे आपल्या कारने आपल्याजवळील रक्कम सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये भरण्यासाठी जात होते

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

प्रदीप कश्यप, प्रतिनिधी दिल्ली, 7 मार्च : एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मद्य कंपनीच्या व्यवस्थापकाची भर चौकात हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोरांनी आधी मद्य कंपनीच्या व्यवस्थापकावर गोळीबार केला. त्यानंतर त्याच्याजवळ असलेले 22 लाख रुपये घेऊन पळ काढला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कौद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे की, पाच बंदूकधारी हल्लेखोर या मद्य कंपनीच्या व्यवस्थापकाच्या दिशेनं आले, त्यानंतर त्यांनी या व्यवस्थापकावर गोळीबार केला. त्यानंतर त्याच्याजवळ असलेले 22 लाख रुपये घेऊन पळ काढला. या घटनेत व्यवस्थापकाचा जागीच मृत्यू झाला आहे. सतनामधील घटना घटनेबाबत अधिक माहिती अशी की, ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील सतनामधील आहे. भाटिया मद्यनिर्मिती कंपनीचे व्यवस्थापक संजय सिंह हे आपल्या कारने आपल्याजवळील रक्कम सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये भरण्यासाठी जात होते. त्यांच्यासोबत त्यांचा ड्रायव्हर देखील होता. हल्लेखोरांना पूर्वीपासूनच संजय सिंह हे बँकेत येणार असल्याची माहिती होती.  ते दबा धरून बसले होते. (पाण्याचा फुगा मारल्याचा जाब विचारला म्हणून बाप-लेकावर कोयत्याने वार, पुण्यातील हादरवणारी घटना) संजय सिंह यांची गाडी समोर येताच पाच हल्लेखोरांनी त्यांच्यावर अंदाधूंद गोळीबार केला. या घटनेत संजय सिंह यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्याजवळ असलेली रक्कम घेऊन पोबारा केला. त्यांच्याकडे बावीस लाख रुपये असल्याची माहिती समोर येत आहे. चालक थोडक्यात बचावला या घटनेमध्ये संजय सिंह यांचा चालक थोडक्यात वाचला आहे. संजय सिंह यांच्यावर झालेल्या या हल्ल्यानंतर शहरात सर्वत्र दहशतीचं वातावरण पसरलं आहे. (जानेवारीत ओळख, नंतर प्रेम अन् लग्नाचे आमिष देत प्रेयसीसोबत भयानक कृत्य) हल्ल्याची माहिती होताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. संजय सिंह यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. हाती लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या