पुणे, 7 मार्च : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत असताना आता पुणे जिल्ह्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पाण्याचा फुगा मारल्याचा जाब विचारला म्हणून बाप- लेकावर कोयत्याने वार करण्यात आला. याप्रकरणी तीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील काळेवाडी परिसरातील एका तरुणावर तीन अनोळखी मुलांनी पाण्याचा फुगा मारला. याचा जाब विचारला असता बाप-लेकावर कोयत्याने वार करण्यात आला. भारतमाता चौकाजवळील रस्त्यावर ही घटना घडली. या हल्ल्यात बापलेक गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना 4 मार्च रोजी रात्री 9.15 वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी अभिषेक हौसराव बचाटे (वय-20,रा.काळेवाडी,पुणे) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यावरुन तीन अनोळखी मुलांवर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी तक्रारदार अभिषेक बचाटे हे तापकीर चौक, काळेवाडी येथून घरी पायी चालत जात होते. यावेळी अनोळखी तीन व्यक्तींपैकी एकाने त्यांच्या पाठीमागून पाण्याने भरलेला पिशवीचा फुगा फेकून मारला. त्यामुळे त्याने मागे फिरुन त्याबाबत आरोपींना जाब विचारला असता त्याचा राग येऊन आरोपींनी त्यांना धक्काबुक्की करत मारहाण केली. जानेवारीत ओळख, नंतर प्रेम अन् लग्नाचे आमिष देत प्रेयसीसोबत भयानक कृत्य दरम्यान, बापलेकांचा ओरडण्याचा आवाज ऐकून तेथे रहात असणारे त्यांचे मामा नितीन प्रभाकर पवार व वडील हौसराव बचाटे हे मुलास वाचविण्यास आले. मात्र, यावेळी आरोपींमधील एका तरुणाने वडीलांवर कोयत्याने वार केला. त्यामुळे त्यांना वाचविण्यासाठी मुलगा अभिषेक मध्ये पडला असता, त्याच्यावरही वार करण्यात आले. यानंतर आरोपी दुचाकीवरून फरार झाले. याप्रकरणी अभिषेक हौसराव बचाटे (वय-20,रा.काळेवाडी,पुणे) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यावरुन तीन अनोळखी मुलांवर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण आहे. पुण्यात गुन्हेगारीच्या घटना वाढल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.