JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / मध्यरात्रीची वेळ अन् माथेफिरुचा पत्नीसह दोन विवाहित मुलींवर हल्ला; हादरवणारी घटना

मध्यरात्रीची वेळ अन् माथेफिरुचा पत्नीसह दोन विवाहित मुलींवर हल्ला; हादरवणारी घटना

मानारामचा स्वभाव रागीट आहे. तसेच तो शिवीगाळ करायचा.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

महेंद्र बिश्नोई, प्रतिनिधी नागौर (राजस्थान) , 4 एप्रिल : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी-मंगळवारीच्या मध्यरात्री एका व्यक्तीने आपल्याच घरात पत्नी आणि मुलींची निर्घृण हत्या केली. रागीट स्वभाव असलेल्या या व्यक्तीने रात्री उशिरा सर्वजण झोपलेले असताना पत्नी व मुलींवर कुऱ्हाडीने वार करत त्यांना संपवले.

या भीषण हल्ल्यात हल्लेखोराच्या दोन्ही मुलींचा जागीच मृत्यू झाला. तर त्याची पत्नी आणि नातू गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सकाळी घटनास्थळ गाठून फरार हल्लेखोराचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. ही हत्या नेमकी का करण्यात आली, पोलीस याचा तपास करत आहेत. ही धक्कादायक घटना दिलढाणी गावात घडली. मानाराम असे आरोपीचे नाव आहे. मानारामची मुलगा हजारी ज्या खोलीत झोपला होता त्या खोलीचा दरवाजा त्याने बंद केला. त्यानंतर पत्नी, नातू व दोन्ही मुलींवर कुऱ्हाडीने वार करून घटनास्थळावरून पळ काढला. यानंतर सकाळी त्याच्या मुलाला दूध विकायला जायचे होते. त्यामुळे सकाळी त्याने खोलीचे दार उघडायचे असल्यामुळे धडपड करावी लागली. यावेळी बाहेरचे दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने तत्काळ परिसरातील सरपंचांना माहिती दिली. त्यानंतर परबतसर पोलीस घटनास्थळी पोहोचले. मानाराम याच्या दोन मुलींचा जागीच मृत्यू झाला होता. तर त्यांची पत्नी आणि नातू गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी अजमेरला पाठवण्यात आले आहे. खुनाचे कारण काय? पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून आरोपीला ताब्यात घेतले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश राम चौधरी यांनी सांगितले की, सुमारे 10 वर्षांपूर्वी आरोपी मानाराम खाणीत काम करत असताना खाली पडला होता. तेव्हापासून तो मानसिक आजारी आहे. त्याचा स्वभाव रागीट आहे. तसेच तो शिवीगाळ करायचा. घरात झालेल्या काही गोष्टीवरून त्याने हे पाऊल उचलले असावे, असा संशय पोलिसांना आहे. मृत्यू झालेल्या दोन्ही मुली विवाहित होत्या. दोघेही दोनच दिवसांपूर्वी माहेरी आले होते. एकीला आज सासरच्या घरी जायचे होते, त्यामुळे मानारामची मोठी मुलगी मीराही तिचा 7 वर्षाचा मुलगा प्रिन्ससोबत माहेरी आली होती. तर आरोपीला ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या