JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / विद्युत पंप सुरू ठेवण्यासाठी मोठी लाच, लातूरमध्ये महावितरणच्या अभियंत्याला रंगेहाथ पकडले

विद्युत पंप सुरू ठेवण्यासाठी मोठी लाच, लातूरमध्ये महावितरणच्या अभियंत्याला रंगेहाथ पकडले

महावितरणच्या सहायक अभियंत्याने शेतकऱ्याची अडवणूक करत लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे.

जाहिरात

फाईल फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लातूर, 7 फेब्रुवारी : राज्यात दिवसेंदिवस आर्थिक फसवणुकीचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. त्यातच लाचखोरीचेही प्रमाण वाढले असल्याचे दिसत आहे. लातूर मधूनही लाचखोरीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतकऱ्याचा विद्युतपंप सुरू ठेवण्यासाठी 25 हजारांची मागणी करण्यात आली होती. यानंतर तडजोड करुन 10 हजारांची लाच स्वीकारताना महावितरणच्या सहायक अभियंत्याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. काय आहे संपूर्ण बातमी - माधवराव सुधाकरराव बिराजदार (वय-40) असे महावितरणच्या लाचखोर अभियंत्याचे नाव आहे. हरंगुळ येथील कार्यालयात कार्यरत असलेल्या या सहायक अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी रंगेहाथ पकडले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. माधवराव सुधाकरराव बिराजदार हा लातूर शहराला लागून हरंगुळ येथील महावितरण कार्यालयात सहायक अभियंता (वर्ग - 2) म्हणून कार्यरत आहे. त्याने नागझरी गावठाण येथील डीपीवरून तक्रारदारासह इतर दोघा शेतकऱ्यांना शेतीचा विद्युत पंप सुरू ठेवण्यासाठी आणि गावठाण डीपीचा शेतीपंपाला वीजपुरवठा सुरू करावा, या कामासाठी पहिल्यांदा 25 हजारांच्या लाचेची मागणी केली. यानंतर तडजोडीअंती 10 हजार रुपये देण्याचे ठरले होते. हेही वाचा -  बहिणीची छेड, जाब विचारायला गेलेल्या तरुणासोबत भयानक कृत्य; नाशिकमध्येही कोयता गँगची दहशत

तर दुसरीकडे संबंधित शेतकऱ्याने याबाबत लातूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. यानंतर या तक्रारीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केल्यानंतर सापळा रचण्यात आला. लातूर शहरातील बार्शी मार्गावर असलेल्या एका बारनजीक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी दुपारी सापळा लावला होता. त्यानुसार, महावितरणचे सहायक अभियंता माधवराव बिराजदार याला 10 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या