5 पोलीस स्टेशनची टीम घेत होते शोध, शेवटी जीव धोक्यात घालून...

डिसेंबर 2022 आणि जानेवारी 2023 मध्ये इराणी टोळीच्या आरोपींनी मुंबईतील बोरिवली पश्चिम येथे असलेल्या MHB पोलीस ठाण्याच्या हद्दीत 3 चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्या. 

MHB पोलिसांनी शातिर इराणी टोळीचा पहिला आरोपी मोहम्मद संगा उर्फ झाकीर फरजत सय्यद (26) याला इराणी वाडी आंबिवली कल्याण येथून अटक केली.

पोलीस अधिकारी काय म्हणाले?

पोलीस अधिकारी काय म्हणाले?

26 जणांच्या पोलीस टीमने 2 रुग्णवाहिका आणि 2 खाजगी गाड्या घेऊन आरोपीला फिल्मी स्टाईलने सापळा रचून अटक केली.

आपला जीव धोक्यात घालून पोलिसांनी इराणी टोळीच्या सोनसाखळी चोराला अटक केली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक संदीप बाळासाहेब साळवे यांच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे. 

मुंबईला राहणारे पोलीस उपनिरीक्षक संदीप बाळासाहेब साळवे हे 2018 पासून ते पोलीस सेवेत रूजू झाले आहेत.