JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / सायकल घेऊन गेलेला ऋतिक रोशन घरी परतलाच नाही; सापडला मृतदेह, हत्येमुळे खळबळ

सायकल घेऊन गेलेला ऋतिक रोशन घरी परतलाच नाही; सापडला मृतदेह, हत्येमुळे खळबळ

सकाळी गेलेला ऋतिक रोशन घरी परतलाच नाही. अखेर त्याचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली.

जाहिरात

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अरुण कुमार शर्मा/पाटणा, 16 मार्च : गुन्हेगारीच्या बऱ्याच घटना तुम्ही ऐकल्या असतील, वाचल्या असतील, पाहिल्या असतील. पण एक अशी घटना आता समोर आली ज्यामुळे खळबळ उडाली आहे. एका सायकलसाठी ऋतिक रोशनची हत्या करण्यात आली आहे. सायकल चोराने सायकल चोरण्यासाठी म्हणून ऋतिक रोशनला संपवून टाकलं आहे. बिहारच्या मुंगेर जिल्ह्यातील ही खळबळजनक घटना आहे. बरियारपूरच्या विजयनगरमध्ये राहणारे ज्योतिष मंडल मजुरीचं काम करतात. त्यांचा 10 वर्षांचा मुलगा ऋतिक रोशन ज्याची सायकलीसाठी हत्या करण्यात आली आहे. सायकल शिकायला गेलेला ऋतिक रोशन घरी परतलाच नाही, अखेर त्याचा मृतदेहच घऱी आला. त्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. शॉपिंगला गेला नवरा, बायकोने उचललं धक्कादायक पाऊल; पती घरी परतताच… कुटुंबाच्या माहितीनुसार बुधवारी सकाळी अकरा वाजता तो सायकल घेऊन घराबाहेर पडला. सायकल शिकण्यासाठी गेला होता. सायकल चालवता चालवता जो गेला तो पुन्हा घरी परतलाच नाही.  त्याला आजूबाजूच्या लोकांनी सगळीकडे शोधलं पण तो सापडलाच नाही. अखेर त्याच्या कुटुंबाने बरियारपूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ त्याचा शोध सुरू केला. पोलिसांनी गावात सगळीकडे चौकशी सुरू केली. काही ग्रामस्थांनी त्याला गावातीलच धीरज नावाच्या तरुणासोबत सायकलवर पाहिलं होतं. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार 20 वर्षांचा धीरज गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. अखेर पोलिसांनी त्याला अटक केली आणि त्याची चौकशी केली. तेव्हा धीरजने ऋतिक ऋतिकची हत्या केल्याची कबुली दिली.

त्याने सांगितलं की सायकलसाठी त्याने ऋतिकचा जीव घेतला. त्याच्या गळ्यात फास टाकून गळा दाबून त्याची हत्या केली. त्याचा मृतदेह जवळच असलेल्या इटहरी गावातील एका विहिरीत फेकला. एका दिवसातच नवरदेवाने आटोपला हनीमून, घरी परतताच नवरीबाईची पोलिसात धाव; FIR दाखल पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा या विहिरीतून ऋतिकचा मृतदेह बाहेर काढला. मृतदेहाच्या गळ्यात फास होता. यानंतर ऋतिकचं कुटुंब पूर्णपणे हादरलं.  ऋतिकला दोन भाऊ आणि एक बहीण होती. तो भावंडांमध्ये सर्वात मोठा होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या