जाहिरात
मराठी बातम्या / Viral / एका दिवसातच नवरदेवाने आटोपला हनीमून, घरी परतताच नवरीबाईची पोलिसात धाव; FIR दाखल

एका दिवसातच नवरदेवाने आटोपला हनीमून, घरी परतताच नवरीबाईची पोलिसात धाव; FIR दाखल

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

एका दिवसाच्या हनीमूनहून परतताच बायकोने आपल्या नवऱ्याविरोधात तक्रार दिली आणि पोलिसांनीही FIR दाखल केला. असं नेमकं घडलं तरी काय?

  • -MIN READ Local18 Uttar Pradesh
  • Last Updated :

कामिर कुरैशी-प्रतिनिधी/लखनऊ, 09 मार्च : लग्नानंतर कपल उत्साहित असतं ते हनीमूनसाठी. लग्नाचे सर्व कार्यक्रम, देवदर्शन झाल्यानंतर नवविवाहित दाम्पत्य एखाद्या रोमँटिक ठिकाणी हनीमूनला जातात. असंच हनीमूनला गेलेलं एक कपल. जे एका दिवसातच हनीमून करून घरी परतलं. त्यानंतर नवरीबाईने नवरदेवाविरोधात पोलीस ठाण्यात धाव घेतली. बायकोने आपल्या नवऱ्याविरोधात तक्रार दिली आणि पोलिसांनीही FIR दाखल केला. असं नेमकं घडलं तरी काय? उत्तर प्रदेशच्या आग्रामधील हे दाम्पत्य. एप्रिल 2022 साली एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये अगदी थाटामाटात या दाम्पत्याचं लग्न झालं. लग्नाच्या 10 दिवसांनंतर नवरा-नवरी हनीमूनसाठी शिमल्याला गेले. दोघं तिथं एका रिसॉर्टमध्ये थांबले. पण एका दिवसात हनीमून आटोपून हे कपल दुसऱ्या दिवशीच घरी आलं. हनीमूनदिवशी जिथं नवरदेवाला नवरीसोबत असायला हवं होतं, तो आपल्या गर्लफ्रेंडसोबत व्हिडीओ कॉलवर गुणूगुणू गप्पा मारत होता. आपला नवरा आपल्याला सोडून दुसऱ्या कुणा महिलेसोबत व्हिडीओ कॉलवर बोलण्यात बिझी आहे हे बायकोने पाहिलं. तिला राग आला आणि तिने विरोध केला. पण प्रकरण चांगलंच तापलं. गर्लफ्रेंडशी बोलण्यास रोखणाऱ्या नवरीबाईला नवरदेवाने मारहाण केली. त्याने तिला इतकं मारलं की तिला वाचवण्यासाठी हॉटेलचा स्टाफमध्ये पडला. दुसऱ्याच दिवशी दोघंही आग्र्याला आपल्या घरी आले. आता काय म्हणावं हिला! म्हणे, ‘नवरा नको, स्मार्टफोन हवा’; मोबाईलवेड्या पत्नीने शेवटी पतीला…. नवरीने आरोप केला की, ग्नानंतर जेव्हा हनीमूनसाठी दोघं शिमल्याला गेले तेव्हा नवरदेवाने कॅनडात घर घेण्यासाठी 50  लाख रुपयांची मागणी केली. पैसे द्यायला नकार दिल्यावर तो भडकला. तिला लग्नात घालण्यात आलेले दागिनेही नंनदेनेही काढून आपल्याकडे ठेवले होते. ती झोपेच्या गोळ्याही द्यायची. सर्वकाही सहन करत होती. पण नवऱ्याला दारूचं व्यसन आहे. गर्लफ्रेंडसमोरही त्याने तिचा अपमान केला. सासऱ्याने तर तिला मानसिकरित्या विकृत असल्याचं म्हटलं. तिच्या माहेरच्यांनी समजावलं होतं. पण तरी सासरच्यांच्या वागण्यात काहीच बदल झाला नाही.

News18लोकमत
News18लोकमत

डिसेंबर 2022 साली तिचा नवरा तिला सोडून कॅनडात गेला. व्हॉट्सअॅपवर जेव्हा तो तिच्याशी बोलतो तेव्हा अपमानास्पद बोलतो. जानेवारी 2023 मध्ये तो परत भारतात आला आणि तिचा छळ करू लागला. तिला दुसरं लग्न करण्याची धमकीही देऊ लागला. फेब्रुवारीमध्ये ती माहेरी निघून गेली. तर तिथंही तो आला आणि तिला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली, असं ती म्हणाली. नवरा-बायकोचं भांडण आणि काही क्षणात दोघांचाही ‘खेळ खल्लास’; असा शेवट झाला की… पाहा VIDEO अखेर तिने पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तिथं तक्रार दिली. एसपी मयंक त्यागी यांनी सांगितलं की, पीडित महिलेने तिचा नवरा आणि सासरच्यांवर गंभीर आरोप केले आहेत. हुंड्यासाठी छळ, मारहाण असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुराव्यानुसार त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात