शहाजहांपूर, 14 मे : एका सरकारी शाळेतील शिक्षिकेवर दुसऱ्या धर्माच्या तरुणाने बलात्कार केला आणि तिचा व्हिडिओ बनवला. यानंतर आता हा नराधम या शिक्षिकेवर धर्म बदलण्यासाठी दबाव आणत आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने शुक्रवारी ही माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, पीडित महिलेच्या तक्रारीवरून गुरुवारी रात्री उशिरा आरोपी तरुणासह पाच जणांविरुद्ध गैरवर्तन आणि धर्मांतरासंबंधी कायद्यासह अन्य कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक (शहर) संजय कुमार यांनी, पीडितेनं नोंदवलेल्या रिपोर्टचा हवाला देत सांगितलं की, कांठ पोलीस ठाणे परिसरातील एका प्राथमिक शाळेत काम करणारी 28 वर्षीय शिक्षिका 4 मे रोजी तिच्या घरी जात होती. तेव्हा बरेंडा गावातील रहिवासी असलेल्या आरोपी आमिरने तिला घरी सोडण्याची ऑफर दिली. आमिर त्याच गावचा आहे जिथे पीडिता शिकवते, त्यामुळे ती आरोपीसोबत घराकडे चालू लागली. हे वाचा - LeT च्या दहशतवाद्याला अटक; सुरक्षा दल, VIP वर हल्ला करण्याचा आखत होता कट पीडितेने तरुणासह त्याच्या संपूर्ण कुटुंबावर आरोप केले कुमार यांच्या म्हणण्यानुसार, वाटेत आरोपीने पीडितेला दारू पाजली. त्यामुळे ती बेशुद्ध झाली. यानंतर आरोपीने पीडितेला त्याच्या घरी नेलं आणि तिथं तिच्यावर बलात्कार केल्यानंतर घटनेचा व्हिडिओ बनवला. पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेनं आरोप केला आहे की, आरोपीची आई, बहीण, भाऊ यांच्यासह कुटुंबातील पाच सदस्य तिला मुस्लीम धर्म स्वीकारण्यासाठी आणि आमिरसोबत लग्न करण्यास भाग पाडत आहेत. हे प्रकरण उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर जिल्ह्यातील आहे. हे वाचा - अल्पसंख्याक मंत्र्याच्या गाडीचा भीषण अपघात, वेगवान कारची ट्रकला धडक आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी पथकं तयार केली पोलीस अधीक्षक (शहर) संजय कुमार यांनी सांगितलं की, या प्रकरणातील पाच आरोपी फरार असून त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी एक पथक तयार केलं आहे. यासोबत पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आल्याचं सांगण्यात आलं. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असं पोलिसांचं म्हणणं आहे. इतकंच नाही तर, पोलिसांनी पीडितेचे न्यायालयात 164 अंतर्गत जबाबही नोंदवले आहेत.