दीड वर्षांपूर्वी कुटुंबाचा विरोध डावलून प्रियकरासोबत पळून गेलेल्या तरुणाचा भयानक अंत
अनुज गौतम, प्रतिनिधी सागर, 09 मे : जवळपास दीड वर्षांपूर्वी कुटुंबाचा विरोध डावलून प्रियकरासोबत पळून गेलेल्या तरुणाचा भयानक अंत झाला आहे. जवळपास 2 वर्ष प्रियकरासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर या तरुणीने लग्नासाठी प्रियकराकडे विचारणा केली. पण, संतापलेल्या तरुणाने तिचा दोरीने गळा आवळून खून केला. तो एवढ्यावरच थांबला नाही, तर मृतदेहावर पेट्रोल टाकून पेटवून दिलं. जोपर्यंत तिचा मृतदेह जळून राख होत नाही तोपर्यंत तो तिथेच उभा होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशमधील सागर येथील कर्रापूर इथं ही घटना घडली आहे. काजल असं मृत तरुणीचे नाव आहे. काजलला 5 बहिणी आहे. तर एक लहान भाऊ आहे. मृत काजलच्या वडिलांचे किरानाचे दुकान होते. याच गावातला पुष्पेंद नावाचा तरुण हा दुकानावर नेहमी ये जा करत होता. त्यामुळे दोघांची ओळख वाढली. त्यानंतर एकमेकांशी फोनवर बोलणं सुरू झालं. मग अचानक एके दिवशी काजल आणि पुष्पेंद्र गायब झाले. काजलचे वडील आपल्या मुलीचा शोध घेत होते. पण कुठेच तिचा थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दिली. पण काहीच उपयोग झाला नाही. अखेरीस मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. (रात्री झोपायला खोलीत गेलं नवविवाहित दाम्पत्य, सकाळी पाहिलं तर खळबळच उडाली) पोलिसांनी जेव्हा काजलचा शोध घेतला तेव्हा ती बहरिया गावात सापडली. पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं आणि तिच्या वडिलांच्या ताब्यात दिलं. पण आता काजल वडिलांसोबत राहण्यास तयार नव्हती. ती फक्त प्रियकर पुष्पेंद्रसोबतच राहणार असल्याचं तिने स्पष्टपणे सांगितलं. ती पुन्हा त्याच्याकडे राहण्यास गेली. पुष्पेंद्र आणि काजलने गुपचूप लग्न सुद्धा उरकले. पण, आपलं लग्न धुमधडाक्यात व्हावे अशी तिची इच्छा होती, पण जातीमुळे पुष्पेंद्रने नकार दिला. (मोबाईलवर गेम खेळताना झालं प्रेम, Boyfriend ला भेटायला दुसऱ्या राज्यात गेली अल्पवयीन मुलगी, पुढे काय झाले?) पण काजलने पुष्पेंद्रला वारंवार लग्नासाठी मागणी घातली. त्याच्याकडे वारंवार विचारणा केली. त्यामुळे पुष्पेंद्रने काजलचा काटा काढण्याचं ठरवलं. त्याने फिरण्याच्या बहाण्याने काजलाला घेऊन गेला आणि वाटेत निर्जन स्थळी नेऊन गाडी थांबवली आणि दोरीने गळा आवळून तिचा खून केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी पुष्पेंद्रला अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.