ऑलआदित्य आनंद, प्रतिनिधी गोड्डा, 9 मे : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत आहे. त्यातच आता सोशल मीडियाचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. त्यावरुन प्रेमसंबंधही जुळत आहेत. तसेच त्यामुळे अनेक कुटुंबांमधील संबंधही खराब होत आहेत. सोशल मीडिया हेच संबंध तुटण्याचेही कारण ठरत आहे. त्यातच आता आणखी एक घटना समोर आली आहे. मोबाईलवर फ्री फायर गेम खेळत असताना झारखंड राज्यातील गोड्डा येथील एका अल्पवयीन मुलाचे पश्चिम बंगालमधील एका अल्पवयीन मुलीवर प्रेम झाले. दोघेही बराच वेळ फोनवर बोलू लागले. दरम्यान, मुलीचे प्रेम इतके वाढले की, ती आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी पश्चिम बंगालहून गोड्डा येथे पोहोचली. मुलगी घरच्यांना न सांगता निघून गेली. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी शोध सुरू केला.
याठिकाणी आई-वडिलांच्या भीतीने अल्पवयीन प्रेयसीला त्याच्या घरी नेण्याऐवजी त्याच्या आजीकडे नेले. आजी-आजोबांना सांगितले की,मुलगी त्याची मैत्रीण आहे आणि त्याला भेटायला आली आहे. दुसरीकडे, मुलीच्या कुटुंबीयांनी तिच्या नंबरवर फोन केला असता, काहीच उत्तर मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी बंगालमधील संबंधित पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची एफआयआर दाखल केली. पोलीस तपासात तरुणीच्या मोबाईलचे लोकेशन गोड्डा येथे आढळून आले. यानंतर बंगाल पोलिसांनी गोड्डा जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर गोड्डा उपायुक्त झीशान कमर आणि एसपी नथु सिंग मीना यांच्या सूचनेवरून जिल्हा बाल संरक्षण अधिकारी रितेश कुमार, गोड्डा ब्लॉकचे बीडीओ रोशन कुमार, मुफसिलचे स्टेशन हाऊस ऑफिसर गिरिजेश कुमार यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. नंतर मुलाच्या वडिलांशी बोलणे झाले आणि अल्पवयीन मुलीला पोलीस ठाण्यात आणून तिचे समुपदेशन करण्यात आले. मुलीने काय सांगितले - मुलीने चौकशीत सांगितले की, मोबाईलवर गेम खेळण्यासाठी गोड्डा येथील मुलाशी मैत्री झाली. त्यानंतर दोघेही एकमेकांना पसंत करू लागले. मुलाला भेटण्यासाठी ती पश्चिम बंगालहून गोड्डा येथे आली आहे. दरम्यान, आता समुपदेशनानंतर ती घरी परतण्यास तयार झाली. त्यानंतर न्यायदंडाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली मुलीला पश्चिम बंगालमध्ये घरी पाठवण्यात आले. तर हे प्रकरण एका अल्पवयीन मुलाशी संबंधित असल्याने जिल्हा प्रशासनाचे अधिकारी काहीही बोलण्यास नकार देत आहेत.