JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / धक्कादायक!..म्हणून त्याने आपल्या मित्राचा प्रायव्हेट पार्ट कापला अन् फोटो प्रेयसीला पाठवला

धक्कादायक!..म्हणून त्याने आपल्या मित्राचा प्रायव्हेट पार्ट कापला अन् फोटो प्रेयसीला पाठवला

एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने आपल्याच मित्राचा प्रायव्हेट पार्ट कापला आणि नंतर त्याचे फोटो आपल्या प्रेयसीला पाठले, संपूर्ण घटना समोर आल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला आहे.

जाहिरात

प्रतिकात्मक छायाचित्र

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

हैदराबाद, 26 फेब्रुवारी : एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या प्रेयसीला कॉल आणि मेसेज केला म्हणून एका तरुणाने आपल्याच मित्राची हत्या केली आहे. हत्या झालेल्या व्यक्तीचे याच मुलीसोबत पूर्वी प्रेमसंबंध होते. त्यानंतर या मुलीचे प्रेमसंबंध आरोपीसोबत जुळले. आपल्या प्रेयसीला तिच्या पूर्वीच्या प्रियकराने फोन केला म्हणून आरोपीने आपल्याच मित्राची हत्या केली. हत्येनंतर आरोपी पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. त्याने अत्यंत क्रूर अशा पद्धतीने आपल्या मित्राची हत्या केली. हत्येनंतर त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला, नंतर त्याची बोटं देखील कापण्यात आली. आरोपीने हत्येची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. एकाच महाविद्यालयात शिक्षण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित नवीन आणि हरिहर कृष्णा हे हैदराबादमधील दिलसुखनगर येथील एका महाविद्यालयात सोबत शिकत होते. नवीन याचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र त्यानंतर काही दिवसांनी ही मुलगी हरिहर कृष्णासोबत राहू लागली. मात्र नवीन हा त्या मुलीला मेसेज करत होता. याच रागातून आरोपी हरिहर कृष्णा याने नवीनच्या हत्येचा कट रचला.

तीन महिन्यांपूर्वीच रचला हत्येचा कट पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार हरिहर कृष्णा याने नवीनच्या हत्येचा कट तीन महिन्यांपूर्वीच रचला होता. त्यानंतर त्याने 17 फेब्रुवारी रोजी नवीन याला एका पार्टीसाठी निमंत्रण दिलं. नवीन या पार्टीला गेला. दारूच्या नशेत दोघांमध्ये पुन्हा भांडण झाले. हरिहर कृष्णा याने नवीनचा गळा दाबून तिथेच हत्या केली. त्यानंतर त्याने त्याचा मृतदेह एका मोकळ्या मैदानात टाकला. आरोपीने त्याच्या शरीराचे छोटे-छोटे तुकडे केले. त्याचा प्रायव्हेट पार्ट आणि हृदय शरीराच्या वेगळे करून त्याने आपल्या प्रेयसिला त्याचा फोटो पाठवला. मात्र हरिहर कृष्णा आपल्यासोबत मजाक करत आहे, असं त्याच्या प्रेयसीला सुरुवातीला वाटलं. मात्र त्यानंतर आरोपी स्वत:च पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या