JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / परिवाराचा विरोध तरी केलं Love Marriage, अवघ्या 10 महिन्यात घडली भयानक घटना

परिवाराचा विरोध तरी केलं Love Marriage, अवघ्या 10 महिन्यात घडली भयानक घटना

प्रेमविवाह केल्यानंतर 10 महिन्यात तरुणीसोबत भयानक घटना घडली.

जाहिरात

मेहुण्याची हत्या

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

हरिकांत शर्मा, प्रतिनिधी आग्रा, 15 मार्च : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत. यातच आता प्रेमनगरी अशी ओळख असणाऱ्या आग्रा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमाच्या शहरात, आग्रा येथे एका प्रेमकथेचा वेदनादायक अंत झाला. भावाने बहिणीच्या पतीची हत्या करत तिचा संसार उद्ध्वस्त केला. ही खळबळजनक घटना आग्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रोहता येथील आहे. काल रात्री एका तरुणाने आपल्या बहिणीच्या पतीची हत्या केली. आरोपीची बहीण आणि तिच्या प्रियकराचा प्रेमविवाह झाला होता. मात्र, मुलीचे कुटुंब या लग्नासाठी तयार नव्हते, अशी माहिती मिळाली आहे. लग्नाला नुकतेच 10 महिने पूर्ण झाले होते. मात्र, बहिणीचा आरोपी भाऊ या गोष्टीवर नाराज होते. त्यामुळे त्याने संधी साधून झोपलेल्या मेव्हण्यावर पिस्तुलाने गोळी झाडून त्याची हत्या केली. तसेच हत्येनंतर आरोपी हा घटनास्थळावरून फरार झाला. दरम्यान, गोळीचा आवाज ऐकून शेजारी घटनास्थळी जमा झाले आणि त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. त्याचबरोबर आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी एक पथक तयार केले आहे. नात्याने भाऊ-बहीण पण तरी जूळलं सूत, प्रेमाला घरच्यांचा विरोध, उचललं भयानक पाऊल कुटुंबाच्या मर्जीविरोधात लग्न - आग्रा येथील सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रोहता गावात सोमवारी रात्री उशिरा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सुमारे 10 महिन्यांपूर्वी राज आणि रमा यांनी कुटुंबाच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला होता. मात्र, रमाचा भाऊ पियुष या लग्नावर खूश नव्हता आणि त्याने बदला घेण्याचे ठरवले होते. काल रात्री संधी मिळताच त्याने मेहुणा राजची गोळ्या झाडून हत्या केली. प्रत्यक्षात गोळी राज याच्या छातीत लागली, त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याचवेळी पियुष घटनास्थळावरून फरार झाला. डीसीपी विकास कुमार यांनी सांगितले की, मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. आरोपी पियुषला पकडण्यासाठी एक टीम तयार करण्यात आली आहे. आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या